विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पेटलेलं असताना, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेबाबत केलेल्या विधानामुळे आणखी वादंग निर्माण होण्याची चिन्हं आहेत. भाजपाने अजित पवार आणि जितेंद्र आव्हाडांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीटद्वारे जितेंद्र आव्हाडांना इशारा दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“हातून सत्ता निसटल्यावर बावचळलेले लोक आहेत हे. संभाजीमहाराज यांचा अवमान करून पोट भरलं नाही तर आता त्या औरंग्याचं गुणगान गाताहेत. जितेंद्र आव्हाड कसला एवढा त्या औरंग्याच्या पुळका? तत्काळ माफी मागा नाहीतर उभा महाराष्ट्र तुमच्या सारख्या औरंग्याच्या अवलादीला गाडल्याशिवाय रहाणार नाही.” असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

हेही वाचा – “जे बाळासाहेबांच्या नावाचा उल्लेख धड करू शकत नाहीत, ते … ” नड्डांच्या भाषणातील ‘त्या’ शब्दावरून अंबादास दानवेंची भाजपावर टीका!

औरंगजेब हिंदूद्वेष्टा नव्हता, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. त्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी जितेंद्र आव्हाड यांना खडे बोल सुनावले आहेत. जितेंद्र आव्हाड हे त्यांच्या सोयीने इतिहास मांडतात असाही आरोप नरेश म्हस्के यांनी केला आहे. त्यांनी आता औरंगजेबाचं मंदिर उभारावं आणि उद्घघाटनाला अजित पवार, संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना बोलवावं असंही त्यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा – “सावरकर आणि गोळवलकरांच्या दृष्टीने संभाजीराजे हे स्त्रीलंपट…”, जितेंद्र आव्हाडांचं खळबळजनक ट्वीट

काय म्हटलं आहे जितेंद्र आव्हाड यांनी? –

“छत्रपती संभाजी महाराजांना आम्ही पहिल्यापासूनच स्वराज्य रक्षक म्हणतो. ते संगमेश्वरला सरदेसाईंच्या वाड्यात होते. ही बातमी औरंगजेबाला दिली कुणी? इथेच तर खरा इतिहास आहे. छत्रपती संभाजी महाराजांना बहादुरगडावर नेण्यात आलं तिथे त्यांचे डोळे काढण्यात आले. त्या ठिकाणी बाजूला विष्णूचं मंदिर आहे. औरंगजेब क्रूर आणि हिंदूद्वेष्टा असता तर त्याने विष्णूचं मंदिरही फोडलं असतं. तिथून छत्रपती संभाजीराजेंना तुळापूरला नेण्यात आलं. त्यानंतर पुढे काय झालं तो इतिहास सगळ्यांनाच माहित आहे. त्यामुळेच मी म्हणतो आहे की उगाच नको त्या इतिहासात जाऊ नका. इतिहास वाद वाढवतो.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader chitra wagh criticizes ncp mla jitendra awad msr
Show comments