शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यात गेल्या दोन दिवसांपासून राजकीय उलथापालथ सुरू आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्याला एकूण ४६ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. तर शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी विधानसभा बरखास्तीच्या दिशेनं जात असल्याचं ट्वीट केलं आहे. यानंतर उद्धव ठाकरेंनी फेसबूक लाइव्हच्या माध्यमातून शिवसैनिकांशी सवाद साधला आहे.

“शिवसेना आणि हिंदुत्व कदापी एकमेकांपासून वेगळं होऊ शकत नाही. आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्यासह काही खासदार, आमदार अलीकडेच अयोध्येला जाऊन आलेत. हिंदुत्वाबद्दल विधानसभेत, विधीमंडळात बोलणारा मी पहिला मुख्यमंत्री असेल,” असं उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

Uddhav Thackeray On Amit Shah
Uddhav Thackeray : “जरा डोक्याला ब्राह्मी तेल लावा, मग…”, उद्धव ठाकरेंची अमित शाह यांच्यावर बोचरी टीका
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Kangana Ranaut criticism that Priyanka Gandhi has no respect for democracy
प्रियंका गांधीना लोकशाहीचा आदर नाही,कंगना रानौतची टीका..
sillod assembly constituency uddhav thackeray campaign for suresh bankar maharashtra assembly elections 2024
ठाकरेंची सत्तारांविरोधात भाजपला साद मतभेद असतील तर बोलू; पण आधी सिल्लोडमध्ये पराभव करण्याचे आवाहन
Aditya Thackeray Dapoli, Aditya Thackeray talk on Hindutva, Uddhav Thackeray,
उद्धव ठाकरे हे घरी एकच असतात व बाहेर देखील एकच असतात – आदित्य ठाकरे
Uddhav Thackeray Speech in Ausa Latur
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची खोचक शब्दांत टीका, “महायुतीला मत म्हणजे गुजरातला मत, कारण..”
devendra fadnavis remark on vote jihad in mumbai
‘व्होट जिहाद’विरोधात ‘मतांचे धर्मयुद्ध’ पुकारावे ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

त्यांनी एक ट्वीट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या अडीच वर्षात सारखं सारखं ‘हिंदुत्व आणि शिवसेना वेगळं होऊ शकत नाही’, असं सांगावं लागतं. यातच तुमचा फोलपणा कळतो, असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी भावनिक शब्दांमध्ये आपली भूमिका मांडली. “समोर बसा. मी आज माझ्या राजीनाम्याचं पत्र तयार ठेवतो आहे. हा कुठेही लाचारीचा प्रसंग नाही. मजबुरी तर अजिबात नाही. काय होईल जास्तीत जास्त? परत लढू. जोपर्यंत माझ्यासोबतच शिवसैनिक आहेत, तोपर्यंत मी कोणत्याही संकटाला भीत नाही. मी आज शिवसैनिकांनाही आवाहन करतोय. ही शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही, असं जे म्हणतात त्यालाही माझ्याकडे उत्तर आहे. जर शिवसेनेच्या कार्यकर्त्याला वाटत असेल की मी शिवसेना प्रमुख पद सांभाळायला नालायक आहे, तर मी शिवसेना प्रमुखपदही सोडेन. पण समोर येऊन सांगायला हवं. मी मुख्यमंत्रीपद आणि शिवसेना प्रमुखपद सोडेन. मी मुख्यमंत्रीपद सोडून पुन्हा शिवसेनेचाच मुख्यमंत्री होत असेल, तर मला आनंद आहे. पण एकदा मला समोर येऊन सांगा. समोर या, आणि सांगा”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.