Five facts about BJP leader Devendra Fadnavis : भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस हे ५ डिसेंबर (गुरूवार) रोजी मुंबईतील आझाद मैदान येते मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. देवंद्र फडणवीस यांच्या नावाची बुधवारी महाराष्ट्र भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकमताने नेमणूक करण्यात आली. यानंतर आता ते तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे देखील देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. आझाद मैदानावर होणार असलेल्या या शपथविधी सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित असणार आहेत. या सोहळ्याच्या आयोजनासाठी जोरदार तयारी केली जात आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

दरम्यान आज केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपाच्या कोर कमिटीची बैठक पार पडली. यामध्ये भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महायुतीचे नेते राज्यपाल सी. पी राधाकृष्णन यांना साडेतीन वाजता भेटून सत्ता स्थापनेचा दावा करतील असे जाहीर केले.

देवेंद्र फडणवीस यांचा नागपूरच्या धर्मपीठ येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री इथं पर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. देवेंद्र फडणवीस यांची राजकीय कारकीर्द वयाच्या २२व्या वर्षी नागपूरमध्ये नगरसेवक ते मुख्यमंत्री पद अशी राहिली आहे. फडणवीसांच्या या राजकीय यशामध्ये त्यांच्या नेतृत्व गुण हेच कारणीभूत असल्याचे बोलले जाते.

हेही वाचा >> पुन्हा मुख्यमंत्रि‍पदासाठी निवड होताच फडणवीसांनी काढली पहाटेच्या शपथविधीची आठवण, म्हण…

१) वकिलीचं शिक्षण घेतलेले देवेंद्र फडणवीस यांची पार्श्वभूमी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडली गेलेली आहे. राजकीय वर्तुळात देवेंद्र फडणवीस यांनी बुद्धिमत्ता आणि वाद-विवाद कौशल्याच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. फडणवीसांनी सलग सहा वेळा नागपूर दक्षिण पूर्व विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला असून यामधून फडणवीसांची या भागातील प्रसिद्धी आणि त्यांच्या कामाचा आवाका लक्षात येतो.

२) देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या वडीलांना तुरूंगात टाकणार्‍या पंतप्रधानांच्या नावाने चालवल्या जाणाऱ्या ‘इंदिरा कॉन्व्हेट’ शाळेत जाण्यास नकार दिला होता. सरस्वती विद्यालयात शिकण्याचा निर्णय घेतल्यापासून सुरू झालेली फडणवीसांची राजकीय कारकि‍र्द महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंत पोहचली आहे. वयाच्या अवघ्या २७व्या वर्षी देवेंद्र फडणवीस नागपूरचे सर्वात तरुण महापौर बनले होते. त्यानंतर राज्यातील गुंतागुंतीची राजकीय परिस्थिती मोठ्या कौशल्याने हाताळत ते पुढे महाराष्ट्राचे दुसरे ब्राम्हण मुख्यमंत्रीदेखील बनले.

३) विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी आरएसएसचे सह सचिव अतुल लिमये आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक है तो सेफ है’ या घोषणेचा पुरेपूर वापर करून घेतला. मौलाना सज्जाद नोमानी यांच्या वोट जिहाद वक्तव्यानंतर त्यांनी निवडणुकीला ‘धर्म युद्ध’ असे म्हणत देत हिंदू मतदारांना आपल्याकडे खेचून आणले.

हेही वाचा>>मुख्यमंत्रि‍पदाचा मार्ग मोकळा होताच देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “…

४) देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्व गुणांमुळे त्यांनी राजकीय वर्तुळात मोठे नाव कमावले आहे. त्यांच्या नेतृत्वात भाजपाने विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. फडणवीस पहिल्यांदा २०१४ मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले, या वेळी त्यांना मराठा आरक्षण, समृद्धी महामार्गासारखे मोठं-मोठे प्रकल्प सुरू करणे अशा काही आव्हानांचा सामना करावा लागला.

५) देवेंद्र फडणवीस यांनी सिंचन घोटाळा उघड करून स्वत:ची योग्यता सिद्ध केली. तसेच भ्रष्टाचाराविरोधातील त्यांची भूमिका देखील यामुळे सर्वांपुढे आली. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात अनेक पायाभूत सुविधांचा विकास करण्यात आला. जल युक्त शिवार योजना देखील फडणवीस यांनीच राज्यभर लागू केली.

Story img Loader