मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार काही आमदारांना बरोबर घेऊन भाजपाला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. तसेच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्यासाठी राजधानी दिल्लीत हालचाली सुरू आहेत, असा दावा संजय राऊतांनी केला होता. अशा घडामोडी सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन दिवसांसाठी आपल्या गावी आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकनाथ शिंदे असं अचानक गावी आल्याने ते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. एकनाथ शिंदेंच्या नाराजीबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीसांनी अवघ्या पाच शब्दांत उत्तर दिलं आहे. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत, अशी चर्चा सुरू आहे” याबाबत विचारलं असता फडणवीसांनी पाच शब्दांत उत्तर दिलं. “तुम्ही संजय राऊतांना भेटलात वाटतं” असं फडणवीस म्हणाले. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस कर्नाटक दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

हेही वाचा- “रिफायनरीसाठी बारसूची जागा उद्धव ठाकरेंनीच सुचवली”, थेट पत्र सादर करत उदय सामंतांचा दावा

दुसरीकडे, शिंदे गटाचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही एकनाथ शिंदेंच्या नाराजीवर भाष्य केलं आहे. “मुख्यमंत्री नाराज असल्याने ते गावाकडे निघून गेले” या तर्कवितर्कांबद्दल विचारलं असता उदय सामंत म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावची जत्रा आहे. ते गावच्या जत्रेला गेले आहेत. गावच्या जत्रेला गेल्यावरही मुख्यमंत्री नाराज आहे असं कुणी म्हणत असेल, तर त्यांचा नागरी सत्कार त्यांच्याच जत्रेत केला पाहिजे.”

“दिल्लीत मुख्यमंत्री बदलासाठी बैठका होत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा”

दिल्लीत मुख्यमंत्री बदलासाठी बैठका होत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होतेय, यावर उदय सामंत म्हणाले, “राजकीय वर्तुळात ८ दिवसांपासून चर्चा सुरू आहेत की, उरलेल्या १३ आमदारांपैकी ७ आमदार आमच्याबरोबर येणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस फुटणार आहे, अशीही चर्चा आहे. काँग्रेसचा बडा नेता भाजपात जाणार अशीही चर्चा आहे. राजकीय वर्तुळात भरपूर चर्चा आहेत. त्या तथ्यात उतरतील तेव्हा त्याचा विचार करू.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader devendra fadnavis reaction on cm eknath shinde upset uday samant rmm
Show comments