Devendra Fadnavis Letter to Voter : लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खालल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेसाठी कंबर कसली होती. लोकसभेच्या पराभवानंतर देवेंद्र फडणवीसांनी जबाबदारीतून मुक्तीसाठी मागणी केली होती. परंतु, पक्षश्रेष्ठींनी ही मागणी मान्य न करता विधानसभेसाठी पुन्हा त्यांनाच संधी दिली. त्यांनी या संधीचं सोनं केलं असून भाजपासह महायुतीतील सर्वच घटकपक्षांच्या जास्त मताधिक्याने जागा आणल्या आहेत. दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी आता मतदार, कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत. त्यांनी यासंदर्भात आज एक्सवर पोस्ट केली.

“महाराष्ट्र विधानसभा २०२४ च्या निवडणुकीत महायुतीला मिळालेला महाविजय फक्त भाजपा-महायुतीचा नाही, तर महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या विश्वासाचा आहे. तुम्ही दाखवलेल्या या विश्वासासाठी आणि दिलेल्या प्रेमाबद्दल महाराष्ट्राच्या जनतेपुढे मी नतमस्तक होतो”, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

Devendra Fadnavis Exclusive
Devendra Fadnavis : “कामाच्या नुसत्या घोषणा नाही, १०० दिवसांत रिपोर्ट कार्ड देणार”, मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली योजना
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
PM Narendra Modi Speech
PM Narendra Modi : नरेंद्र मोदींचं वक्तव्य; “आपल्या देशातल्या एका पंतप्रधानांना मिस्टर क्लिन म्हटलं जायचं, तेच म्हणाले होते…”
Raj Thackeray should come to Sangamner to see why Balasaheb Thorat was defeated says MLA Amol Khatal
माजी मंत्री थोरात यांचा पराभव का झाला ते पाहण्यासाठी राज ठाकरेंनी संगमनेरात यावे – आमदार अमोल खताळ
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Ajit Pawar On Jitendra Awhad
Ajit Pawar : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीबद्दल जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांच्या तपासात…”
Ajit Pawar On Mahayuti Politics
Ajit Pawar : राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? संजय राऊतांच्या दाव्यावर अजित पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले…

हेही वाचा >> Sharad Pawar : “मी घरी बसणार नाही”, विधानसभेच्या पराभवानंतर शरद पवारांनी सांगितली पुढची रणनीती!

“मेहनत, एकजूटता, लाडक्या बहिणींचे आशीर्वाद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वावर महाराष्ट्राच्या तमाम जनतेने दाखविलेला विश्वास या विजयाचे खरे शिल्पकार आहेत. महायुतीतील सर्व घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी, मित्रमंडळी आणि माझा प्रत्येक समर्पित कार्यकर्ता ज्यांनी गेले काही दिवस जिवाचे रान करून वेळ-काळ न पाहता मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, अशा सर्वांचा मी कायम ऋणी राहीन!”, असं फडणवीस म्हणाले.

“आपणा सर्वांच्या पाठिंब्यामुळेच महायुतीला मिळालेल्या या विजयाने एक नवीन दिशा दिली आहे. हे यश आपल्या महाराष्ट्राला एक प्रगतीशील आणि सर्वसमावेशक भवितव्यासोबत मोदींच्या नेतृत्वात विकसित भारतासह विकसित महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रेरणा देत राहील. पुन्हा एकदा आपले मनःपूर्वक आभार. आपला विश्वास आणि प्रेम सदैव राहो. हीच ईश्वरचरणी प्रार्थना”, असं म्हणत त्यांनी सर्वांचे आभार मानले.

विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती…

लोकसभेनंतर लगेचच विधानसभेच्या निवडणुका झाल्या असत्या तर त्याचा फटका महायुतीला बसण्याची शक्यता होती. त्यामुळे फडणवीस यांनी पराभवाच्या कारणांचा शोध घेत त्यावर उपाययोजना सुरू केल्या. शिवाय कार्यकर्त्यांचे मनोबल खचू नये म्हणून त्यांच्यात पुढची निवडणूक आपणच जिंकणार असा विश्वास निर्माण केला. प्रचारासाठी बुथनिहाय नियोजन करण्यात आले. उमेदवारी वाटप करताना सर्व समाजघटकांचा विचार करण्यात आला. ‘लाडकी बहीण’ योजनेच्या अंमलबजावणीचा लाभ निवडणुकीत व्हावा हे चाणाक्षपणे पाहण्यात आले. या सर्व प्रयत्नांचे फळ म्हणून भाजपसह महायुतीतील घटक पक्षांनाही मिळाले.

Story img Loader