भाजप नेते आणि विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे यांचा मुलगा निखिल खडसे याने आज स्वत:च्या डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केली. जळगाव जिल्हयातील मुक्ताईनगर येथे राहत्या घरी ही घटना घडली. स्वत:च्या परवाना असलेल्या पिस्तूलातून त्यांनी स्वत:च्या डोक्यात गोळ्या झाडल्या. आज दुपारी ही घटना घडल्यानंतर निखिल खडसेला उपचारासाठी गोदावरी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यानच सायंकाळी सहा वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.
निखील खडसे यांनी गेल्यावेळी विधानपरिषेदची निवडणूक लढवली होती, त्यात त्यांचा पराभव झाला होता. सध्या ते जिल्हा परिषद सदस्य होते. राजकारणात रस नसतानाही आईच्या आग्रहास्तव त्यांना राजकारणात यावे लागले होते अशी माहिती निकटवर्तीयांकडून मिळाली आहे. मात्र, निखिल यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.
निखिल यांच्या मृत्यूची बातमी मिळताच महाराष्ट्रातील भाजपचे बडे नेते जळगावच्या दिशेने रवाना झाले आहेत. उद्या (गुरूवार) सकाळी जळगावातच निखिल खड़से यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा