मोहनीराज लहाडे, लोकसत्ता

नगर: अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून ते पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर असे करावे, अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधान परिषदेत करताच शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी त्यावर प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्याचे आश्वासन दिले. मुळात ही मागणी जिल्ह्यातून पुढे आलेली नाही. भाजपमध्येही त्याबद्दल मतमतांतरे आहेत. शिवसेनेसह हिंदूत्ववादी संघटनांनी यापूर्वीच अहमदनगरचे नाव अंबिकानगर ठेवावे अशी मागणी केलेली आहे. आमदार पडळकर यांच्या नामांतराच्या मागणीमुळे राज्यातील इतर जिल्ह्यांबाबत असलेल्या वादात आता अहमदनगरही ओढले गेले आहे.

police action against handcart pullers and auto driver for blocking roads and footpaths in dombivli
डोंबिवलीत रस्ते, पदपथ अडविणाऱ्या हातगाडी, रिक्षा चालकांवर कारवाई, नागरिकांनी व्यक्त केले समाधान
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Municipal employees sealing a property in Kalyan East
कल्याण पूर्वेत थकबाकीदारांच्या मालमत्तांना टाळे
mmrda acquire farmers lands in 124 villages of uran panvel and pen for third mumbai
भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांची एकजूट; उरण, पनवेलमधील १२४ गावे संपादित करण्याची अधिसूचना
Panvel Municipal Commissioner decision to build infectious disease hospital in Kalamboli
कळंबोलीत साथरोग रुग्णालय; पनवेल महापालिका आयुक्तांचा निर्णय, २७ कोटींचा खर्च अपेक्षित
Satavahana settlement remains were found at Tekabhatti four kilometers from Chivandagaon Gondpipari taluka
चंद्रपूर जिल्ह्यात सातवाहनकालीन वस्तीचे अवशेष; कधी होते मोठे शहर, आज आहे गर्द वनराई…
Nalasopara Unauthorized Building, Supreme Court,
पुरे झाली शोभा…
Food stalls from IT Park to Mate Chowk have found new ways to avoid legal action
पदावरील खाद्यापदार्थ विक्रेत्यांची अशीही चलाखी उघड; पोलीस, महापालिकेनेच दाखवली पळवाट?

सुमारे वीस-बावीस वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नगरच्या सभेत बोलताना अंबिकानगर नावाची मागणी केली होती. मात्र नंतर शिवसेनाही या मागणीबाबत फार आग्रही राहिली नाही किंवा राज्यात शिवसेना सत्तेवर आली तरी या पक्षाने याबाबत काही हालचाल केली नाही, निर्णय घेतला नाही. अलीकडच्या काळात धनगर आरक्षण प्रश्नावर लढे सुरू झाले. या लढय़ातून आरक्षणाच्या मागणीबरोबरच नगरचे नाव बदलून ते अहिल्यादेवी नगर करावे या मागणीचा समावेश करण्यात आला. माजी खासदार विकास महात्मे यांनी नागपूर येथील समाजाच्या मेळाव्यात ही मागणी केली होती.

आमदार पडळकर यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून पुन्हा ही मागणी केली. या दरम्यानच्या काळात नगरमधील कोणताही पक्ष, संघटना, संस्था यांनी ही मागणी केली नव्हती किंवा पडळकर ज्या पक्षाचे आहेत त्या भाजपनेही ही मागणी कधी केली नाही. उलट यासंदर्भात बोलताना भाजपचेच नगरमधील खासदार डॉ. सुजय विखे यांनी त्यावेळी काहीसे विरोधातच मत व्यक्त केले होते. अहमदनगरच्या नामांतराचा विषय आमच्या, पक्षाच्या कार्यक्रम पत्रिकेवर नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आमदार पडळकर या मागणीवर पक्षातही एकाकी असल्याचे दिसते.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे चोंडी हे जन्मगाव. हे गाव नगर जिल्ह्याच्या एका टोकाला आहे. या गावाचा तीर्थक्षेत्र, पर्यटनदृष्टय़ा विकास करण्याचा आराखडा गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. अहिल्यादेवींच्या यंदाच्या जयंती महोत्सवात, चोंडी गावात राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आमदार रोहित पवार विरुद्ध भाजप आमदार पडळकर यांच्यामध्ये संघर्ष उडाला होता. त्यानंतर पडळकर यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून नामांतराची मागणी केली होती. मुळात नगर जिल्ह्यातील नागरिकांची फार पूर्वीपासून प्रमुख मागणी आहे ती जिल्हा विभाजनाची. त्याचा कोणत्याही काळातील सत्ताधारी किंवा राजकीय नेते गांभीर्याने विचार करत नाहीत. तरीही नामांतराच्या संवेदनशील विषयात पडळकर यांनी हात घातला आहे.

Story img Loader