राज्यात मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण तापलं आहे. मराठा समुदायाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. या मागणीला अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं, त्यांना ओबीसीमधून आरक्षण देऊ नये, अशी भूमिका भुजबळांनी घेतली आहे. शिवाय ओबीसी जनगणनेसाठी मी पंतप्रधान मोदींना भेटणार असल्याचंही भुजबळांनी म्हटलं आहे. यावर आता भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ओबीसींची जनगणना करण्यासाठी छगन भुजबळ पंतप्रधान मोदींची भेट घेणार असल्याबाबत विचारलं असता गोपीचंद पडळकर म्हणाले, “चांगला विषय आहे. ओबीसींची जनगणना झाली पाहिजे, हे सगळ्यांचंच मत आहे. अलीकडेच जेव्हा ओबीसींची बैठक झाली. तिथेही या मुद्यावर चर्चा झाली. आमच्या एका सहकाऱ्याने व्यवस्थितपणे हा विषय मांडला. तेव्हा सरकारनेही सकारात्मकता दाखवली होती. त्यामुळे ओबीसींची जनगणना झाली पाहिजे, हे माझंही मत आहे.”

State Congress president Nana Patole demanded those who desecrate constitution should punished
“संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे,” नाना पटोले यांची टीका; म्हणाले…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Rahul narvekar
विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप अर्जच नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण
News About Parliament
BJP : उपराष्ट्रपती व्ही. पी. धनखड यांना हटवण्यासाठी विरोधकांचा गोंधळ, भाजपाने नेमकी काय खेळी केली?
Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”
Rahul Narwekar
विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळणार का? अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केली भूमिका
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “दाढी कुरवाळण्याच्या नादात जे काही पाप केले…” हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मनसेची उद्धव ठाकरेंवर टीका
President Bashar al Assad forces defeated in parts of Syria
सीरियावर बंडखोरांचा ताबा… अध्यक्ष बशर अल असद परागंदा… नेमके काय घडले? अमेरिका, रशिया, इराण, तुर्कीयेचा काय संबंध?

मराठा आरक्षणाबाबत पडळकर पुढे म्हणाले, “मराठा आरक्षणाबाबत आमची भूमिका स्वच्छ आणि स्पष्ट आहे. महाराष्ट्रातील गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना जसं वेगळं आरक्षण दिलं होतं, तसं आरक्षण मराठा समाजाला द्यावं, त्या आरक्षणाला आमचा सर्वांचा पाठिंबा आहे. त्यामुळे आमची काल जी भूमिका होती, तीच आज आहे आणि उद्याही तीच भूमिका असेल. मराठा आरक्षणाला आमचा नेहमीच पाठिंबा आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी २०१३ साली मी सर्वात आधी सांगली जिल्ह्यात दोन मोर्चे काढले होते. त्यामुळे आमची भूमिका एकदम स्पष्ट आहे.”

Story img Loader