Harshvardhan Patil : विधानसभेची निवडणूक जवळ आल्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक नेत्यांचे विविध मतदारसंघात दौरे सुरु आहेत. या दौऱ्यांच्या माध्यमातून कामांचा आढावा आणि उमेदवारांची चापणी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून केली जात आहे. अशातच भारतीय जनता पक्षाला एक मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. यावर आज हर्षवर्धन पाटील यांनी सूचक प्रतिक्रिया देत राष्ट्रवादी अजित पवार गटावर अप्रत्यक्ष टीका केली. “महायुतीमधील एक पक्ष उमेदवारी जाहीर कसा करतो?”, असा सवाल हर्षवर्धन पाटील यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला.

हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?

“जनतेचा आग्रह हा महत्वाचा असतो. कारण कुठलाही पक्ष हा जनतेवर अवलंबून असतो. शेवटी जनता महत्वाची असते आणि जनतेचं मत काय आहे? हे देखील महत्वाचं असतं. त्याच पद्धतीने आमचा प्रवास सुरु आहे. आता आम्ही महायुतीमध्ये आहोत. महायुतीमधील नेत्यांनी काही गोष्टी मला कबूल केल्या होत्या. त्यामुळे एकदा त्यांना भेटून वस्तुस्थिती काय आहे? ते पाहणार आहे”, अशी सूचक प्रतिक्रिया हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

Narendra modi Rahul Gandhi Bal Thackeray
Narendra Modi : नरेंद्र मोदींचं मविआ नेत्यांना आव्हान; बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत म्हणाले, “राहुल गांधींकडून…”
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Sharad Pawar Dhananjay Munde
Sharad Pawar : “सत्ता फार लवकर डोक्यात गेली”, शरद पवारांचा धनंजय मुंडेंना टोला; म्हणाले, “अडचणींच्या काळात…”
saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”
Sanjay singh
Sanjay Singh: आपचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह म्हणतात, “हम ना बटेंगे ना कटेंगे; हम भाजप को लपेटेंगे”
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”
Sunil Tatkare on Jayant Patil
“जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांनी…”, अजित पवार गटाकडून टीका; म्हणाले, ‘यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार’
narendra modi criticized congress rahul gandhi
“संविधानाच्या नावाखाली लाल पुस्तकं छापून काँग्रेसने…”; नांदेडच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल!

हेही वाचा : Tanaji Sawant vs Ajit Pawar: “अजित पवार आधी वाघ होते, पण आता…”, तानाजी सावंत यांच्या विधानानंतर शरद पवार गटाची खोचक टीका

“आपल्याकडे लोकशाही आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपआपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. एकदा आमचा दौरा होऊ द्या. त्यानंतर मग सर्व प्रमुख लोकांशी संवाद साधून विचारविनिमय करावा लागेल. मी एकटा कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. शेवटी सध्याचा काळ असा आहे की, जनतेला विश्वासात घेऊनच निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे त्या पद्धतीने पुढे चर्चा करू”, असं सूचक विधानाही हर्षवर्धन पाटील यांनी केलं.

हर्षवर्धन पाटलांची अजित पवारांवर टीका

“महायुती म्हटल्यानंतर तीन पक्ष आले. आता महायुतीमधील तीन पक्षांपैकी एक पक्ष तर काही मतदारसंघात जाऊन उमेदवारच जाहीर करायला लागला आहे. आमच्या मतदारसंघातही त्यांनी दोन दिवसांपूर्वी सांगितलं की आम्हीच पुन्हा लढवणार वैगेरे-वैगेरे…, असं बरंच काही त्यांनी सांगितलं. मग महायुतीमधील जागा वाटपाबाबतचा अंतिम निर्णय झाले आहेत की नाही? नेमकं काय ठरलं आहे? याबाबत आम्हालाही काही समजायला मार्ग नाही. त्यामुळे या विषयांवर आम्ही वरिष्ठ नेत्यांशी एकदा बोलणार आहे”, असं म्हणत हर्षवर्धन पाटील यांनी अप्रत्यक्ष अजित पवार गटावर टीका केली.

इथेनॉल निर्मितीवरील निर्णयावर हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?

केंद्र सरकारने मोलॅसिस ज्यूस व सिरप पासून इथेनॉल निर्मितीसंदर्भातील घेतलेल्या निर्णयानंतर हर्षवर्धन पाटील म्हणाले, “गेल्या सहा महिन्यांपासून आम्ही यासंदर्भात प्रयत्न करत होतो. याबाबत आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही भेटलो. १० ऑगस्ट रोजी मुंबईत एक कार्यक्रम झाला तेव्हा आणि त्याआधी दिल्लीत एक कार्यक्रम झाला होता तेव्हाही आम्ही त्यांच्याशी बोललो होतो. अखेर काल यासंदर्भातील निर्णय झाला. २०२४-२५ या गळीत हंगामाला केंद्र सरकारच्या मोलॅसिस ज्यूस व सिरप पासून इथेनॉल निर्मितीसंदर्भातील निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल”, असंही हर्षवर्धन पाटील यावेळी म्हणाले.