राष्ट्रवादीचे बडे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल आणि पुण्यातील घरांवर अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) छापेमारी केली आहे. या छापेमारीनंतर भाजपाचे नेते किरीट सोमय्यांनी हसन मुश्रीफ यांचं काऊंटडाऊन सुरु झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरेंच्या माफिया सरकारमधील आणखी एक मंत्री हसन मुश्रीफांवर ईडीची कारवाई सुरु झाली, असं किरीट सोमय्यांनी सांगितलं. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

आणखी वाचा – Hasan Mushrif ED Raid: NCP नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची छापेमारी; कागलमध्ये समर्थक आक्रमक

tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
court sentences man to 20 year imprisonment for sexually assaulting girl by making false marriage promise
पुणे: लग्नाचं आमिष दाखवणं पडलं महागात; लैंगिक अत्याचारा प्रकरणी ‘या’ न्यायालयाने सुनावली वीस वर्षाची शिक्षा
benefits of eating saunf before bed
रात्रभर झोप लागत नाही? झोपण्यापूर्वी ‘हे’ खा; शांत झोप लागेल अन् तणावही होईल दूर
shukra guru make navpancham yog
नवपंचम राजयोग देणार पैसाच पैसा; ‘या’ तीन राशींवर शुक्र-गुरूची होणार कृपा
vivek oberoi bollywood struggle
पहिल्याच सिनेमासाठी दिग्दर्शकानं नाकारलं, झोपडपट्टीत राहिला होता ‘हा’ अभिनेता; अनुभव शेअर करत म्हणाला, “मी त्यांच्या बोलण्याचा…”
Salman Khan
‘दबंग’ रिलोडेड लाइव्ह कॉन्सर्टसाठी सलमान खान सज्ज; म्हणाला, “स्टेजवर जाण्याआधी कपडे…”
Allu Arjun
वाढलेल्या दाढीमुळे बाप-लेकीच्या नात्यात दुरावा; अल्लू अर्जुन म्हणाला, “मी मुलीला…”

किरीट सोमय्या म्हणाले, “हसन मुश्रीफ यांनी १५८ कोटी रुपये स्वत:, मुलगा आणि जावायच्या नावाने कोलकात्यामधील अनेक बोगस आणि शेल कंपनीत गुंतवले. त्यानंतर हे पैसे परिवाराच्या कंपनीत घेत, सरसेनापती कारखान्याच्या खात्यात वळवले. २८ सप्टेंबर २०२१ ला कोल्हापूर महालक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी निघालो होतो. पण, तेव्हा हसन मुश्रीफ, तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरेंनी मला जाऊ दिलं नाही. मात्र, आता महालक्ष्मीच्या आशीर्वादाने हसन मियांचं काऊंटडाऊन सुरु झालं आहे.”

आणखी वाचा – किरीट सोमय्या यांची भविष्यवाणी अन् ‘ईडी’ची कारवाई

एका विशिष्ट जातीधर्माच्या लोकांना लक्ष्य केलं जात आहे, असा आरोप हसन मुश्रीफ यांनी केला. त्याला प्रत्युत्तर देताना किरीट सोमय्यांनी सांगितलं, “हसन मियांना आता धर्म आठवतो का? मी महालक्ष्मीच्या दर्शनासाठी जात असताना मला अडवलं. तेव्हा मुस्लीम धर्म नाही आठवला. पैसे खाताना आणि गरीब शेतकऱ्यांना लुटताना धर्म नाही आठवला. बोगस बंद कंपन्यांच्या माध्यमातून तुमच्या परिवाराच्या अकाऊंटमध्ये भ्रष्टाचाराचे ५० कोटी रुपये आले. मात्र, हसन मुश्रीफांनी थोडा धीर धरावा. कारण, पहिल्यांदा अनिल परब, हसन मुश्रीफ आणि मग अस्लम शेख यांचा नंबर आहे,” असा दावा किरीट सोमय्यांनी केला आहे.

Story img Loader