शिवसैनिकांनी माझ्या गाडीवर दगडफेक केल्याचा आरोप भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी केलाय. सोमय्या यांनी आपल्या गाडीचे दोन फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये गाडीवर शाई फेकण्यात आल्याचं दिसत आहे. सोमय्या यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हे केल्याचा आरोप करत त्यांना गुंड असं म्हटलं आहे.

दुपारी पाऊणच्या सुमारास केलेल्या ट्विटमध्ये सोमय्या यांनी दोन फोटो पोस्ट केलेत. हा सर्व घटनाक्रम साडेबाराच्या सुमारास घडल्याचं सोमय्या यांनी म्हटलं आहे. वाशिममधील बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्याजवळ ही घटना घडल्याचं सोमय्या यांनी म्हटलं आहे.

Viral video shows car hitting woman distracted by phone the Internet is stunned by what she does next
फोनमध्ये पाहत रस्ता ओलांडते महिला, कारने दिली जोरदार टक्कर अन्…, थरारक अपघाताचा Video Viral
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
court accepts report filed by eow against shiv sena leader ravindra waikar in Jogeshwari land scam mumbai
रवींद्र वायकर यांच्याविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंद; गुन्हे शाखेने दाखल केलेला अहवाल न्यायालयाने स्वीकारला
young girl fight with ola auto viral video
“ये आदमी पागल है”, तरुणीने रिक्षाचालकाला केली शिवीगाळ अन्…, पुढे जे घडलं ते खतरनाक, पाहा VIDEO
Shocking accident a young man riding a scooter with his phone collided with a car video viral
VIDEO: असा भयंकर अपघात कधीच पाहिला नसेल! स्कूटर चालवता चालवता कारला आदळला अन्…, पुढे तरुणाबरोबर जे झालं ते पाहून उडेल थरकाप
Raosaheb Danave kick viral Video
Raosaheb Danve Viral Video: रावसाहेब दानवेंची लाथ बसलेल्या कार्यकर्त्याची प्रतिक्रिया समोर; म्हणाला, “म्हणून साहेबांनी मला…”
Narendra Mehta, Geeta Jain, Geeta Jain agitation,
भाईंदर : नरेंद्र मेहता यांच्या विरोधात आक्षेपार्ह मजकूर, कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल झाल्याने जैन यांचे ठिय्या आंदोलन

कालच सोमय्या यांनी ट्विटरवरुन आपण २० ऑगस्ट रोजी शिवसेना खासदार भावना गवळी आणि समूहाचा १०० कोटी रुपयांचा घोटाळा उघड करण्यासाठी तसेच या प्रकरणाचा पाठपुरवठा करण्यासाठी वाशिमला भेट देणार असल्याचं जाहीर केलं होतं. याच भेटीदरम्यान हल्ला करण्यात आल्याचं सोमय्या यांचं म्हणणं आहे. त्यामुळेच त्यांनी ट्विटमध्ये खासदार भावना गवळी आणि १०० कोटींचा घोटाळा या दोन गोष्टींचा उल्लेख केलाय.

सकाळी वाशिमला पोहचल्यानंतरही सोमय्या यांनी ट्विटरवरुन फोटो पोस्ट केले होते. खासदार भावना गवळी ग्रुपचे १०० कोटींचे घोटाळे, हायवे कंत्राट अडथळे, खासगी कंपन्या, बँका, पोलीस स्थानकाला भेट देणार असल्याचं सोमय्या या ट्विटमध्ये म्हणाले होते.

हा हल्ला शिवसैनिकांनी केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला असला तरी या संदर्भात अद्याप शिवसेनेनं कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.