माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. कारण भाजपाचे नेते किरिट सोमय्या रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी पोहचले आहेत. किरीट सोमय्या यांनी ३१ डिसेंबरलाच एक व्हिडिओ ट्विट केला होता. या व्हिडिओत आपण नव्या वर्षात कुणाकुणाचा हिशोब चुकता करणार आहोत हे सांगितलं होतं. त्यानंतर लगेचच दुसऱ्य दिवशी ते रेवदंडा या ठिकाणी पोहचले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

किरिट सोमय्यांनी व्हिडिओत काय म्हटलं होतं?
नव्या वर्षात घोटाळे बाहेर काढणार असल्याचं किरीट सोमय्यांनी जाहीर केलं होतं. एक व्हिडिओ ट्विट करत किरीट सोमय्या म्हणाले की उद्यापासून सुरू होणाऱ्या नवीन वर्षात अनिल परब, हसन मुश्रीफ, अस्लम खान, किशोरी पेडणेकर यांच्या सदनिका आणि ठाकरे परिवाराचे १९ बंगले हे सगळे घोटाळे बाहेर काढणार. त्यानंतर ते आज तातडीने रेवदंडा या ठिकाणी पोहचले आहेत.

ठाकरे परिवाराच्या १९ बंगल्यांचा हिशोब सुरू असंही ट्विट

किरीट सोमय्यांनी नवीन वर्षी सकाळी ११.३० ला रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असाही इशारा दिला होता. त्या आशयाचं एक ट्विटही किरीट सोमय्यांनी केलं होतं. त्यानंतर ते रेवदंडा या ठिकाणी पोहचले.

फेब्रुवारी महिन्यातही किरीट सोमय्यांनी दाखल केली होती तक्रार

“रश्मी उद्धव ठाकरे यांच्या कोर्लई गावातील १९ बंगल्यांची कागदपत्रं देत आहोत. आम्हाला आतापर्यंत हे बंगले तिथे आहेत, असं सांगण्यात येत होतं. लेखी उत्तरं सुद्धा तशीच होती. त्यानंतर आम्ही ग्रामपंचायत कार्यालयाला भेट दिली. त्यानंतर बंगले नाहीत.’
असं सांगण्यात येतं आहे. सदर जागेवरील बंगलोचं काय झालं याची चौकशी करावी, विनंती”, अशा आशयाची तक्रार सोमय्यांनी पोलिसांना दिली आहे. यावर आमदार प्रशांत ठाकूर, महेश भोसले यांनीही सह्या केल्या होत्या.

फेब्रुवारी २०२२ मध्येही किरीट सोमय्यांनी हे प्रकरण बाहेर काढलं होतं त्यावेळी त्यांनी कोर्लई या गावाला भेटही दिली होती. कोर्लई या गावातल्या सरपंचांनी २०१९च्या ग्रामसभेत रश्मी ठाकरे यांनी अर्ज केला होता. त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की २०१४ मधअये मी जो करार नोंदणी केला ती जमीन आणि इतर सर्व गोष्टी अन्वय नाईक यांच्याकडून घेतल्या. ताडाची, माडाची झाडं, विहिरी हे सगळं माझं आहे. जमीन माझ्या नावावर झाली आहे. मात्र घरंही माझ्या नावार झाली पाहिजेत असं रश्मी ठाकरेंनी अर्जात म्हटल्याचं किरीट सोमय्यांनी म्हटलं होतं. मे २०१९ च्या ग्रामसभेत सरपंचांनी प्रस्ताव मंजूर केला. त्यात सगळी घरं रश्मी उद्धव ठाकरे आणि मनिषा रविंद्र वायकर यांच्या नावे करावीत असं म्हटलं होतं. जून २०१९ मध्ये हा प्रस्ताव मंजूर झाला. ही घरं त्यांच्या नावावर करण्यात आली असंही किरीट सोमय्यांनी स्पष्ट केलं होतं. आता पुन्हा याच बंगल्यांवरून सोमय्या आक्रमक झाले आहेत हे पाहण्यास मिळतं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader kirit somaiya to lodge complaint against rashmi thackeray 19 bunglow at revdanda police station scj