Kirit Somaiya Latest Marathi News : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडीओचे विधिमंडळात पडसाद उमटले. महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या सोमय्या यांना भाजपा पाठीशी घालणार का? असा सवाल विरोधकांनी विधान परिषदेत केला. यावर सोमय्या यांच्यावरील आक्षेपार्ह व्हिडीओची वरिष्ठ पातळीवर सखोल चौकशी केली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केली. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ठिकठिकाणी सोमय्या यांच्या विरोधात आंदोलन केले. दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर मुंबई पोलीस सक्रिय झाले आहेत.

किरीट सोमय्या यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली. अंबादास दानवे यांनी हा मुद्दा विधान परिषेदत उचलून धरला. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पेन ड्राईव्ह सादर करत याप्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली. दरम्यान, याप्रकरणी देवेंद्र फडणवीसांना चौकशीचे आदेश दिल्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने तत्परतेने तपास करण्यास सुरुवात केली आहे.

RSS Sambhal violence fact check in marathi
Fact Check : संभल हिंसाचारामागे RSS कार्यकर्त्यांचा हात? तुपाच्या डब्यात लपवून करत होते शस्त्रांचा पुरवठा? व्हायरल Video मागचं सत्य काय, वाचा
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
High Court orders Mumbai Police regarding atrocity case against Nawab Malik Mumbai news
मलिक यांच्याविरोधातील ॲट्रोसिटी प्रकरणाचा तपास चार आठवड्यांत पूर्ण करा; उच्च न्यायालयाचे मुंबई पोलिसांना आदेश
myra vaikul baby brother naming ceremony
Video : मायरा वायकुळच्या लहान भावाच्या बारशाचा राजेशाही थाट! नाव ठेवलंय खूपच खास, अर्थही सांगितला
loksatta readers response
लोकमानस : अदानी देशापेक्षा मोठे आहेत का?
senior citizen who wants to remarry was defrauded by cyber thieves
पुनर्विवाहाच्या आमिषाने कर्वेनगर भागातील ज्येष्ठाची फसवणूक, ज्येष्ठाला जाळ्यात ओढून पोलीस कारवाईची धमकी
Lalu Prasad Yadav Controversial comment
Lalu Prasad Yadav Video : “नयन सेंकने….”; नितीश कुमार यांच्या महिला संवाद यात्रेबद्दल लालू प्रसाद यादव यांचं आक्षेपार्ह वक्तव्य
senior citizen cheated , Crime case against cyber thieves,
पुणे : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची फसवणूक, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा

हेही वाचा >> सोमय्यांच्या VIDEO वर आव्हाडांचं ट्वीट, त्यावर मुलगी म्हणाली, “बाबा, जेव्हा तुम्ही…”

“मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने या प्रकरणातील तपास सुरू केला आहे. तांत्रिक (Technical) आणि सायबर तज्ज्ञांच्या मदतीने गुन्हे शाखा युनिट १० या व्हिडीओमागची सतत्या तपासणार आहेत”, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली असल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

“किरीट सोमय्या राजकीय दलाल”

विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमय्या यांच्या ध्वनिचित्रफितीचा मुद्दा उपस्थित केला. केंद्रीय सुरक्षा दलाच्या सुरक्षा व्यवस्थेत फिरणारे सोमय्या कोणते धंदे करतात हे समोर आले आहे. यामुळे त्यांची सुरक्षा व्यवस्था तात्काळ काढून घेण्यात यावी, अशी मागणी दानवे यांनी केली. तसेच आठ तासांच्या कालावधीच्या ध्वनिचित्रफितीचा पेनड्राइव्ह दानवे यांनी उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडे सुपूर्द करीत याची चौकशी करून कारवाईची मागणी केली. सोमय्या हे मराठीद्रोही असून राजकीय दलाल आहेत, असा आरोपही दानवे यांनी केला. विरोधी पक्षांनी हा मुद्दा उचलून धरत चौकशीची मागणी केल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सखोल चौकशी करण्याची घोषणा केली.

हेही वाचा >> “जैसी करनी…”; किरीट सोमय्या आक्षेपार्ह व्हिडीओप्रकरणी संजय राऊत स्पष्टच बोलले

किरीट सोमय्यांंनीची केली होती चौकशीची मागणी

माझ्या संदर्भात काही ध्वनिचित्रफिती समाज माध्यमांमध्ये प्रसारित झाल्या आहेत. माझ्याकडून महिलांचे लैंगिक शोषण झाल्याचा आरोप करण्यात येतो. तथापि, माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अत्याचार झालेला नाही, असा खुलासा किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच प्रसारित झालेल्या ध्वनिचित्रफितीची सत्यता तपासावी, अशी मागणी सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.

सोमय्या यांचे पोलीस आयुक्तांना पत्र

कथित आक्षेपार्ह चित्रफितीप्रकरणी किरीट सोमय्या यांनी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना पत्र पाठवून यासंदर्भात चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्याबाबत पोलीस तपासणी करीत आहेत. या प्रकरणात सुमारे आठ तासांच्या ३५ चित्रफिती असल्याची चर्चा आहे. एका मराठी वृत्तवाहिनीवर एक चित्रफीत प्रदर्शित करण्यात आली, अशा प्रकारच्या अनेक चित्रफिती उपलब्ध आहेत. तसेच, अनेक महिलांवर अत्याचार केले, अनेक महिलांच्या तक्रारी आल्या आहेत असेही दावे केले जात आहेत. मात्र माझ्याकडून कोणत्याही महिलेवर असे अत्याचार झालेले नाही, असे किरीट सोमय्या यांनी पत्रात म्हटले आहे.

हेही वाचा >> Kirit Somaiya : “तुम्ही दिलेला पेन ड्राईव्ह पाहणं म्हणजे…”; सोमय्याप्रकरणी नीलम गोऱ्हेंची प्रतिक्रिया

तक्रार करण्यासाठी पुढे यावे

विरोधी पक्षनेते दानवे यांनी दिलेला पेनड्राइव्ह मी महिला पोलीस अधिकारी आणि महिला डॉक्टरांच्या मदतीने तपासणार आहे. आपली सभागृहातील चर्चा ऐकून या प्रकरणात शोषण झालेल्या महिलेने तक्रार दाखल करण्यासाठी पुढे आले पाहिजे. यापूर्वी अनेक महिला सभागृहातील चर्चा ऐकून तक्रार दाखल करण्यासाठी पुढे आल्या आहेत, या महिलेने देखील पुढे यावे, असे उपसभापती गोऱ्हे यांनी म्हटले आहे. वृत्तवाहिन्यांनी ध्वनिचित्रफीत प्रसारित करताना काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.

Story img Loader