शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीतून बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली आहे. बंडखोर आमदारांना ताकद दिली ही माझी चूक आहे. राजकारणात जन्म दिलेल्या आईला गिळायला निघालेली ही औलाद आहे. विश्वासघातक्यांना माझ्याबद्दल काय वाटतं याबद्दल मला चिंता नाही. महाराष्ट्राच्या जनतेला मी त्यांच्या कुटुंबातला वाटतो, हे माझं भाग्य आहे, असं उद्धव ठाकरे मुलाखतीत म्हणाले. ही मुलाखत शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी घेतली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या मुलाखतीनंतर भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊतांवर टीकास्त्र सोडलं आहे. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना आधी मुख्यमंत्रीपदावरून खाली खेचलं आणि आता मुलाखत घेऊन त्यांच्या जखमेवर मीठ चोळलं आहे. त्यांनी आपले गुरू शरद पवार यांनी दिलेलं काम पूर्ण केलं असून ते मनातल्या मनात खूश आहेत, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

हेही वाचा- “बाळासाहेब त्यांचे वडील असले तरी त्यांच्यापेक्षा जास्त आमचा अधिकार आहे त्यांच्यावर”; उद्धव ठाकरेंना मनसे नेत्याचं प्रत्युत्तर

संबंधित मुलाखतीचा उल्लेख करत नारायण राणे म्हणाले, “मी आजारी होतो, माझं ऑपरेशन झालं होतं, मी शुद्धीवर नव्हतो, त्याचवेळी गद्दारांनी सरकार पाडलं, असं उद्धव ठाकरे मुलाखतीत म्हणतात. पण ते (बंडखोर आमदार) शिवसैनिक होते, ते निवडून आले होते, त्यांनी सत्ता आणली होती. त्यानंतर जेव्हा उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांचं जमलं नाही, विचार जुळले नाहीत. उद्धव ठाकरे पक्षपात करायला लागले, त्यामुळे त्यांनी दुसरा गट तयार करून शिवसेनेच्याच नावाने बाहेर पडले आणि दुसऱ्या सरकारमध्ये गेले.”

हेही वाचा- “दीपक केसरकर हा भामटा आणि लबाड माणूस” शिवसेना नेत्याची बोचरी टीका!

“स्वत:चं पद एकनाथ शिंदे यांना मिळालेलं पाहून उद्धव ठाकरेंना पोटसूळ झालं. यातूनच ही मुलाखत संजय राऊतांना घ्यायला लावली. संजय राऊतांनीही अजून एक काम हातात घेऊन ते पूर्ण करायला लागले. ते कोणतं काम? तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून खाली खेचायचं हे पहिलं काम आणि आता त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी ही मुलाखत घेतली. या मुलाखतीनंतर संजय राऊत मनातून खूश आहेत. मी विजयी ठरलो. माझ्या गुरुने पवारसाहेंबानी दिलेलं काम मी उत्तमप्रकारे हाताळलं याचं समाधान राऊतांना आहे” अशी बोचरी टीका नारायण राणे यांनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader narayan rane on uddhav thackeray interview taken by shivsena mp sanjay raut rmm
Show comments