भारतीय जनता पार्टीचे नेते नितेश राणे यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात जाऊन थेट पोलिसांना धमकीवजा इशारा दिला आहे. कथित लव्ह जिहाद प्रकरणावरून नितेश राणे यांनी पोलीस ठाण्यात शिरून पोलिसांना जाब विचारला. तसेच राज्यात सध्या आमचं सरकार आहे, मी गप्प बसणार नाही. लव्ह जिहादप्रकरणी संबंधित तरुणावर कारवाई झाली नाही, तर पोलीस ठाण्यात येऊन धिंगाणा घालेन, अशा शब्दांत राणेंनी पोलिसांनी इशारा दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं प्रकरण काय आहे?
कथित लव्ह जिहादप्रकरणी उल्हासनगरमधील काही कार्यकर्ते उल्हासनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायला गेले होते. यावेळी पोलिसांनी संबंधित कार्यकर्त्यालाच मारहाण करून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली, असा आरोप आहे. या प्रकारानंतर नितेश राणे यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात जाऊन थेट पोलिसांना धमकीवजा इशारा दिला आहे.

हेही वाचा- “…तेव्हा तुम्ही काय करत होता?” राधाकृष्ण विखे पाटलांचा शरद पवारांना टोला!

“पोलिसांकडून आम्हाला न्याय मिळत नसेल तर आम्ही पोलीस ठाण्यात कशाला यायचं? जातीवरून धमक्या दिल्यानंतर आम्ही गप्प बसणार नाही. आता आम्ही सरकारमध्ये आहोत. त्यामुळे कुणाचं काय करायचं ते आम्ही बघू. तुम्ही संबंधितांवर काय कारवाई करणार? हे मला सांगा. अन्यथा मी आताच या लोकांना घेऊन गृहमंत्री देवेंद्र फडवीसांना भेटायला जाणार आहे. योग्य ती कारवाई करा, नाहीतर मी पोलीस ठाण्यात येऊन धिंगाणा घालेन. मी आता गप्प बसणार नाही. आमच्या घरातही मुख्यमंत्री राहिलेले आहे. त्यामुळे हे सगळं कसं सरळ करायचं? हे आम्हाला चांगलं माहीत आहे” अशा शब्दांत नितेश राणेंनी पोलिसांना इशारा दिला आहे.

हेही वाचा- “…त्यांना शरम उरली नाही” आदित्य ठाकरेंची शिंदे-फडणवीस सरकारवर खोचक टीका!

या सर्व प्रकारानंतर नितेश राणेंनी प्रसारमाध्यमांशीही संवाद साधला आहे. यावेळी राणे म्हणाले की, मुलींना गायब करणं, त्यांना बाहेर नेऊन विकणं… असे प्रकार कल्याण आणि उल्हासनगर परिसरात सुरू आहेत. त्यामुळे पोलिसांना सिंघम बनायचं असेल तर त्यांनी मुलींची फसवणूक करणाऱ्या मुलांना पकडलं पाहिजे. असे धर्मांतराचे प्रकार थांबवले पाहिजेत. आमच्या कार्यकर्त्यांना मारण्याची हिंमत कशाला करता? मारहाण करणाऱ्या अधिकाऱ्याची योग्य जागी तक्रार करणार आहे. आमच्या कार्यकर्त्यांवर पुन्हा अशाप्रकारे अन्याय होणार नाही, याची सर्व खबरदारी आम्ही घेऊ, अशी प्रतिक्रिया राणेंनी दिली आहे.