Nitin Gadkari: “ज्याप्रमाणे पिक जोमाने आल्यानंतर त्यावर रोगराई पसरते. अशावेळी फवारणी करून रोगराईचा नायनाट करावा लागतो. त्याप्रमाणे आता भाजपा पक्षात कार्यकर्त्यांचा भरपूर ओघ येत आहे. त्यात चांगले दाणे आहेत, त्याप्रमाणे रोगराईदेखील आहे. त्याच्यावर फवारणी करायला लागते. ते काम आम्ही करत आहोत”, असे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. मुंबई तक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये नितीन गडकरी यांनी याबाबत भाष्य केले आहे. कार्यकर्ते घडविताना काय काळजी घेतली पाहीजे, याबाबत बोलत असताना नितीन गडकरी यांनी हे उदाहरण दिले आहे.

भारतीय जनता पार्टी ही केडरबेस संघटना असल्याचे नितीन गडकरी मुलाखतीत म्हणाले. “नवनवीन लोक पक्षात येत असतात. त्या कार्यकर्त्यांना विचारधारा समजावून सांगणं, प्रशिक्षण देणं, कार्यकर्त्याला घडवणं ही आमची जबाबदारी आहे. हजारो कार्यकर्ते घडविल्यानंतर ते फिल्डवर काम करत असतात. पण एखादा कार्यकर्ता असे काही बोलतो की हजार कार्यकर्त्यांच्या कामावर पाणी सोडलं जातं. त्यामुळे कार्यकर्त्याला घडविण्याची प्रक्रिया आमच्या पक्षात नित्य सुरू असते. देशात आज विचारभिन्नता अडचण नाही तर विचारशून्यता ही अडचण आहे. राजकारणात आज जे लोक काम करतात, त्यांना स्वतःविषयी चिंता असते. माझे काय होईल? मला तिकीट मिळणार का? मला सत्ता द्या, हा मी वरचढ होऊ लागला आहे. समाजाची चिंता असलेला कार्यकर्ता पक्षाची ताकद आहे”, अशी भावना नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.

Prashant Bamb BJP MLA
“मरेपर्यंत पस्तावशील, हे लोक तुला…”, भाजपा आमदाराची भर सभेत अरेरावी; प्रश्न विचारणाऱ्यांना कार्यकर्त्यांनी हुसकावलं
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
peticoat cancer
साडी नेसणार्‍या महिलांना ‘पेटिकोट कॅन्सर’चा धोका? हा प्रकार काय आहे? अभ्यास काय सांगतो?
MLA Satej Patil On Madhurima Raje
Satej Patil : Video : मधुरिमाराजे यांची निवडणुकीतून माघार; कार्यकर्त्यांशी बोलताना सतेज पाटलांना अश्रू अनावर; म्हणाले, “उद्या योग्य तो निर्णय…”
What Poonam Mahajan Said About Pramod Mahajan ?
Poonam Mahajan : ‘प्रमोद महाजन यांना ठार करण्याचं षडयंत्र कशासाठी आखलं गेलं?’ पूनम महाजन यांचं उत्तर, “त्यांना…”
amol kolhe bag checked after uddhav thackeray
उद्धव ठाकरेंनंतर महाविकास आघाडीच्या आणखी एका नेत्याच्या बॅगची तपासणी, नेमकं काय घडलं?
Ajit Pawa
Ajit Pawar : “आई म्हणाली, माझ्या लेकाला…”, अजित पवारांच्या बहिणीनं सांगितलं पवार कुटुंबात काय घडतंय
love lagna locha new marathi movie
‘Love लग्न लोचा’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला! चित्रपटात दमदार कलाकारांची मांदियाळी, प्रमुख भूमिकेत झळकणार ‘ही’ फ्रेश जोडी…

हे वाचा >> Raj Thackeray: ‘मी सामान्य राजकारणी नाही, मला इतरांप्रमाणे समजू नका’, एकनाथ शिंदेंचं कौतुक केल्यानंतर राज ठाकरेंचं मोठं विधान

भाजपाला संघाची गरज आहे का?

भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोन्ही संघटना वेगवेगळ्या आहेत. संघ हे सांस्कृतिक संघटन आहे. संघात जे स्वंयसेवक आहेत त्यांना राजकीय काम करण्याची इच्छा असेल तर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. दोन्ही संघटनांचा हेतू वेगवेगळा आहे. त्यामुळे त्यांचे काम स्वतंत्र सुरू असते, असेही नितीन गडकरी म्हणाले.

हे ही वाचा >> “मी जातीयवादी असल्याचा पुरावा द्या” म्हणणाऱ्या शरद पवारांना राज ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले, “जेव्हा पुण्यात…”

जात फक्त पुढाऱ्यांच्या मनात

महाराष्ट्राच्या राजकारणात जात हा मुद्दा मागे पडत चालला आहे. जातीच्या आधारावर जर निवडणुकीचे परिणाम पाहायला गेले तर ते निकालानंतर चुकल्याचे दिसते. जात आता समाजात उरली नसून ती पुढाऱ्यांच्या मनात उरली आहे. अनेक ठिकाणी असे पुढारी आहेत की, ज्यांच्या जातीचे मतदार त्या त्या मतदारसंघात फारसे नसतात. तरीही ते त्याठिकाणी जिंकून येत असतात. काही निवडक पुढारी जातीचे राजकारण करत असतात. मात्र लोकांचा कल आता विकासाकडे आहे, असे नितीन गडकरी म्हणाले.