भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांची शिवशक्ती परिक्रमा यात्रा आज जेजुरीत आली होती. जेजुरी गडावर पंकजा मुंडे यांनी खंडोबाचं दर्शन घेतलं आणि भंडारा उधळला. भाजप नेत्या पंकजाताई मुंडे यांनी आज जेजुरीच्या खंडोबा गडा वर येऊन देवदर्शन घेतले.तळी- भंडारा झाल्यावर भंडार खोबऱ्याची उधळण केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंकजाताई मुंडे यांची शिवशक्ती परिक्रमा यात्रा आज जेजुरीत सकाळी साडेदहा वाजता आली, ढोल- ताशाच्या गजरात त्यांचे भाजप कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी स्वागत केले. पंकजाताई खंडोबा गडावर आल्या तेव्हा त्यांचे समवेत आमदार माधुरी मिसाळ, जिल्हाध्यक्ष वासुदेव नाना काळे, भाजप नेते बाबा जाधवराव,श्रीकांत ताम्हाणे,साकेत जगताप, जेजुरी भाजपचे अध्यक्ष सचिन पेशवे, गणेश भोसले,विठ्ठल सोनवणे आधी उपस्थित होते . खंडोबा देवस्थानच्या वतीने विश्वस्त अनिल सौंदाडे, ऍड विश्वास पानसे, अभिजीत देवकाते यांनी घोंगडी काठी व खंडोबा प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार केला.

हे पण वाचा- ..आणि भाजपा नेत्या पंकजा मुंडेंनी फिरवली भाकरी! शिवशक्ती परिक्रमा दौऱ्यात आदिवासी महिलांशी संवाद

खंडोबाचे दर्शन झाल्यावर पितळी कासवावर तळी भंडारा करून त्यांनी येळकोट- येळकोट जय मल्हार असा जयघोष करीत भंडार खोबरे उधळले.

काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

जेजुरीच्या खंडोबा गडावर मी पहिल्यांदाच आले आहे, खंडोबा गड पाहून खूप आनंद वाटला. खंडोबा देव सामान्य माणसाचे प्रतीक आहे. घरात शुभ कार्य झाल्यावर जोडीने जेजुरीला यावे लागते. राज्य शासनातर्फे येथील खंडोबा गडाची पुरातन वास्तू जतन करण्याचे काम सुरू आहे, सोन्याची जेजुरी हळदीने माखली आहे,खूप समाधान वाटले, असे त्या म्हणाल्या.खंडोबाला काय मागितले असे पत्रकारांनी विचारले असता देव सर्व ज्ञानी आहे,असे त्यांनी हसत- हसत उत्तर दिले व त्या शिखर शिंगणापूर मंदिराकडे मार्गस्थ झाल्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader pankaja munde at jejuri she said i came here for the first time scj
Show comments