भाजपा नेत्या पंकजा मुंडे या सध्या शिवशक्ती परिक्रमा दौऱ्यावर आहेत. त्यांनी मंगळवारी नाशिकमधल्या नांदूरशिंगोटे गावाला भेट दिली. त्यावेळी पंकजा मुंडे यांनी एकलव्य आदिवासी वस्तीवर जाऊन पिठलं, भाकरी या गावरान जेवणाचा आस्वाद घेतला. एवढंच नाही तर त्याआधी पंकजा मुंडे यांनी चुलीजवळ बसून भाकरी थापल्या आणि भाजल्या देखील. पंकजा मुंडेंचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नांदूरशिंगोटे गावात गेल्या होत्या पंकजा मुंडे

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी श्रावण महिन्याचं औचित्य साधून राज्यभरातल्या मंदिरांना भेट देण्यासाठीचा दौरा सुरु केला आहे. आज त्यांच्या दौऱ्याचा तिसरा दिवस आहे. त्यांनी काही वेळापूर्वीच जेजुरी या ठिकाणी जाऊन खंडोबाचं दर्शन घेतलं आणि भंडारा उधळून पूजाही केली. नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी त्र्यंबकेश्वरला भेट दिली. तसंच नांदूरशिंगोटे या ठिकाणी जाऊन आदिवासी वस्तीत भाकऱ्याही थापल्या. पंकजा मुंडे यांच्या या व्हिडीओची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे.

गावरान जेवणाचा घेतला आस्वाद

आदिवासी वस्तीवरच्या एका घरात जाऊन पंकजा मुंडे यांनी भाकरी थापल्या, भाकरी भाजल्याही. तसंच त्यानंतर पिठलं आणि भाकरी या जेवणाचा आस्वादही घेतला. देवराम आगिवले यांच्या घरी त्या जेवण करायला थांबल्या होत्या. भाकरी, पिठलं, कुळथाचे शेंगोळे, मटकीची उसळ, ठेचा आणि शेंगदाण्याची पोळी अशा जेवणाचा आस्वाद पंकजा मुंडेंनी घेतला.

२०१९ मध्येच मी शिवशक्ती परिक्रमा यात्रा काढायचं ठरवलं होतं. मात्र त्यावेळी मला शक्य झालं नाही. गोपीनाथ मुंडेंना जसं जनतेचं प्रेम मिळालं तसंच प्रेम मलाही मिळालं, मिळतं आहे हे पाहून मी भारावून गेले आहे असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader pankaja munde made bhakris in shivshakati rally in nashik tour scj
Show comments