भारतीय जनता पार्टीच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी नुकतीच एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या विविध राजकीय घडामोडींवर भाष्य केलं आहे. शिवसेना पक्षात पडलेली फूट, नवीन सरकार, एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश… अशा विविध प्रश्नांवर पंकजा मुंडे यांनी सडेतोड उत्तरं दिली आहेत. एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय चुकला का? असा प्रश्न विचारला असता पंकजा मुंडे यांनी मोठं विधान केलं आहे.
‘न्यूज १८ लोकमत’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंकजा मुंडे म्हणाल्या की, “पहिली गोष्ट मी कुणत्याही व्यक्तीबाबत मत बनवत नाही. तसेच कुणाचा निर्णय चुकला किंवा बरोबर आहे? हे सांगण्याएवढी मी परिपक्कं आणि मोठी नाही. दुसरी गोष्ट म्हणजे एखादा निर्णय घेण्यासाठी परिस्थिती भाग पाडत असते. तुमच्या नाका-तोंडात पाणी चाललं असताना, तुम्ही एखाद्या झाडाची फांदी पकडली, तर ती फांदी पकडू नका, असं आपण म्हणू शकत नाही.”
“लोकं परिस्थितीमुळे एखादा निर्णय घेत असतात. त्यामुळे तो निर्णय चुकला की बरोबर आहे? हे लोकं ठरवत असतात. पक्ष सोडून गेल्याबाबत तुम्ही फक्त त्यांचं एकट्याचंच नाव घेतलं, हा त्यांच्यावर अन्याय आहे. अनेक लोकांनी पक्ष बदलले. त्यांची यादी वाचायची असेल तर दोन-तीन तासही पुरणार नाहीत” असं विधान पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

हेही वाचा- “…तोपर्यंत मी जगात कुणालाही घाबरत नाही” धनंजय मुंडेंची जोरदार डायलॉगबाजी!
“लोकं परिस्थितीमुळे एखादा निर्णय घेत असतात. त्यामुळे तो निर्णय चुकला की बरोबर आहे? हे लोकं ठरवत असतात. पक्ष सोडून गेल्याबाबत तुम्ही फक्त त्यांचं एकट्याचंच नाव घेतलं, हा त्यांच्यावर अन्याय आहे. अनेक लोकांनी पक्ष बदलले. त्यांची यादी वाचायची असेल तर दोन-तीन तासही पुरणार नाहीत” असं विधान पंकजा मुंडे यांनी केलं आहे.
हेही वाचा- पंकजा मुंडे राष्ट्रवादीत प्रवेश करतील? एकनाथ खडसेंचं स्पष्ट विधान, म्हणाले…
एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी भाजपाला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांचा पक्षातील काही नेत्यांशी अंतर्गत कलह सुरू होता. पक्षातील काही नेत्यांकडून त्यांचं खच्चीकरण केलं जातंय, अशा बातम्या समोर येत होत्या. यानंतर अलीकडेच एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. आता ते राष्ट्रवादीकडून विधान परिषद आमदार आहेत.