माझ्या कारखान्यावर छापेमारी झाली तेव्हा दोन दिवसांत ११ कोटींचा निधी तुम्ही लोकांनी जमा केला. तुम्हाला मी काय दिलं? तुम्ही उन्हात बसला आहात म्हणून स्टेजही उन्हातच बांधलं आहे. एकवेळ मला काही मिळालं नाही तरीही चालेल पण तुमचा हक्क तुम्हाला मिळाला पाहिजे असं पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“न जाने मुझे कैसे परखता है मेरा उपरवाला.. इम्तेहान सख्त लेता है मगर हारने नहीं देता है.. असा शेरही आज पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. माझ्या आयुष्यात मी एखादी निवडणूक मी हरले असेन तरीही तुमच्या (जनतेच्या) नजरेतून मी पडलेले नाही. इथे आलेला एखाद्या जातीचा माणूस नाही. गोपीनाथ मुंडे म्हणायचे तसं माझ्या कातड्याचे जोडे करुन घातले तरीही तुमचं हे प्रेम, आपुलकी आणि ऋण मी फेडू शकत नाही. शेती करणारे लोक आज आनंदात आहेत का? त्यावर उपस्थितांनी नाही असं उत्तर दिलं. माझ्या भाषणात शेतमजूरही करणारे लोक आलेत त्यांनाही मजुरी मिळत नाही. ही आज परिस्थिती आहे. उस तोड कामगार आहेत, त्यांना पैसे वाढवून मिळणार नाहीत तोपर्यंत ते उस तोडायला जाणार नाही. सगळ्यांच्या कष्टाचं चीज होईपर्यंत मी शांत बसणार नाही असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

आज महाराष्ट्रात एवढे गंभीर प्रश्न आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न एवढा गंभीर झाला आहे. ओबीसी समाज सरकारकडे आशेने पाहतो आहे. आता अपेक्षाभंगाचं दुःख कुठलाही समाज सहन करु शकत नाही. शिवशक्ती परिक्रमेसाठी जेव्हा मी गेले तेव्हा जेसीबीने फुलं उधळून माझं स्वागत करण्यात आलं. मी तुम्हाला स्वाभिमान देऊ शकते म्हणून तुम्ही माझं स्वागत अशा पद्धतीने केलं होतं. गोपीनाथ मुंडे राज्याचे उपमुख्यमंत्री होतील असं त्यांनाही वाटलं नव्हतं. मात्र त्यांनी कष्ट केले, मला राजकारणात आणलं तेव्हा एकच सांगितलं पंकजा तुझ्या पदरात मी जनता टाकतो आहे त्यांची काळजी घे. ज्यादिवशी तुम्ही माझ्या कारखान्यासाठी तुम्ही पैसे जमवत होतात तेव्हा माझ्या मुलाने मला फोन केला आणि मला सांगितलं की इतके पैसे जमा केले आहेत ते तू घेणार आहेस का? मी म्हटलं मी पैसे घेणार नाही पण लोकांचे आशीर्वाद घेणार. भगवानबाबांच्या साक्षीने तुम्हाला सांगते की माझ्या मुलाआधी, कुटुंबाआधी ही जनता माझी जबाबदारी आहे. माझ्यावर आई म्हणून माझा मुलगा जितकं प्रेम करतो त्यापेक्षा जास्त प्रेम ही जनता माझ्यावर करते हे मी मुलाला सांगितलं असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात मराठा समाजाने, उसतोड कामागारांनी, शेतकऱ्यांनी सगळ्यांनीच माझं स्वागत केलं. सगळ्यांनी केलेलं स्वागत माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. मी त्यासाठी तुम्हा सगळ्यांपुढे नतमस्तक होऊन आभार मानते असं पंकजा मुंडे आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच म्हणाल्या.

माझ्याकडे पद नाही, खुर्ची नाही.. तरीही तुम्ही माझ्यासाठी आला आहात तेव्हा शांतपणे भाषण ऐका. घोषणा बंद करा असं पंकजा मुंडे म्हणाल्या. दसऱ्याच्या निमित्ताने पंकजा मुंडे यांनी सावरगावात दसरा मेळावा घेतला. त्यामध्ये त्या बोलत होत्या. मी शिवशक्ती परिक्रमा केली तेव्हा माझं इतकं स्वागत होईल असं वाटलं नव्हतं. भव्य स्वागत दिव्यत्वाकडे नेण्याचं काम महाराष्ट्राने केलं असंही आपल्या पंकडा मुंडे यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader pankaja munde speech from bhagwan gad she use famous sher in her speech scj