लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सध्या सुरु आहे. या प्रचाराच्या भाषणात राजकीय नेते एकमेकांवर टीका टिप्पणी करताना दिसून येतात. आता भारतीय जनता पार्टीचे नेते, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी एका सभेत बोलताना शिवसेना शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांच्याबाबत एक मिश्किल वक्तव्य केलं. रावसाहेब दानवे यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

रावसाहेब दानवे नेमकं काय म्हणाले?

“सत्तार साहेब मैं तुम्हारा साला हूँ, क्यू बार-बार मेरे पे शक करते हो, एकदा दोनदा संशय घेऊ शकतात. पण आता सगळं सोडा. शत्रुत्व कसे करायचे हे तुम्हाला माहिती आहे आणि मैत्री कशी करायची हे मला पण माहिती आहे. आपलं काय शत्रुत्व आहे का? सगळ्या गोष्टी सोडा. अब्दुल सत्तार साहेब आणि मी बसलो. मी त्यांना सांगितलं, संपू्र्ण जग इकडचे तिकडे होईल. दोन्ही पक्षांनी आपल्याला सांगितलं, लोकसभेला अब्दुल सत्तार मला (रावसाहेब दानवे यांना) पाठिंबा देणार आणि भारतीय जनता पक्ष विधानसभेला त्यांना (अब्दुल सत्तार यांना) पाठिंबा देणार”, असे रावसाहेब दानवे म्हणाले.

devendra fadnavis ajit pawar eknath shinde (3)
Devendra Fadnavis Video: गृहखातं पुन्हा तुमच्याकडेच येणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अरे बाबा…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
Zeenat Aman
‘डॉन’ नाही, तर ‘या’ चित्रपटात दिसणार होतं ‘खइके पान बनारस वाला’ गाणं पण…, झीनत अमान यांनी सांगितलेला किस्सा चर्चेत
Image of Vice-President Jagdeep Dhankhar or Rajya Sabha proceedings
No Confidence Motion : भारताच्या संसदीय इतिहासातील सर्वात मोठी घटना, राज्यसभा सभापतींच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव
suraj chavan meet dcm ajit pawar
“देवमाणूस आहेत दादा…”, अजित पवार उपमुख्यमंत्री होताच सूरज चव्हाण पोहोचला मंत्रालयात! नव्या घराबद्दल म्हणाला…
Nana Patole Speech About Rahul Narwekar ?
Nana Patole : नाना पटोलेंचं वक्तव्य; “राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन, मात्र २०८ मतांनी मी निवडून आलो म्हणून टिंगल..”

हेही वाचा : संजय राऊत यांचा मोठा दावा; म्हणाले, “उज्ज्वल निकम उमेदवार असले तरी…”

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे त्यांच्या भाषणाच्या शैलीमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्याकडे थेट आणि स्पष्ट बोलणारे नेते म्हणून पाहिले जाते. लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करतानाही रावसाहेब दानवे यांनी केलेल्या पेहरावाची चर्चा रंगली होती. यानंतर आता एका सभेत बोलताना अब्दुल सत्तार यांना मिश्किल टोला लगावल्याने ते पुन्हा चर्चेत आले आहेत. दरम्यान, जालना लोकसभा मतदारसंघात रावसाहेब दानवे हे महायुतीचे उमेदवार आहेत. तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे नेते कल्याण काळे निवडणुकीच्या मैदानात आहेत. दोन्हीही उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरु आहे.

Story img Loader