Raosaheb Danve Viral Video: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अनेक नेत्यांकडून विविध भागात जाहीर सभा घेण्यात येत आहेत. या माध्यमातून महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण पाहायला मिळत आहे. असं असतानाच भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यासह फोटो काढत असताना एका कार्यकर्त्याला लाथ मारल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. यावरून रावसाहेब दानवे यांच्यावर विरोधकांनी टिकेची झोड उठवली होती. मात्र, यावर आता खुद्द रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया देत नेमकं काय झालं होतं? हे सांगितलं आहे.

रावसाहेब दानवे काय म्हणाले?

“मी प्रथम कार्यकर्ता आहे आणि मग नेता आहे. नेता म्हटलं की अशा गोष्टी लोकांच्या नजरेत लवकर येतात आणि मग चर्चा होते. मात्र, जेव्हा माझ्यातला कार्यकर्ता जागा होतो ना तेव्हा मला कार्यकर्त्याचा रोल करावा लागतो. आता संतोष दानवे यांचा उमेदवारीचा अर्ज दाखल करण्याच्या सभेच्या दिवशी मुंबईत रात्री आमची कोअर कमिटीची एक महत्वाची बैठक होती. मला त्या बैठकीला जाणं गरजेचं होतं. पण त्या सभेच्या वेळी कार्यकर्ते हटायला तयारच नव्हते. तेव्हा मी कार्यकर्त्यांना सांगितलं चला. पण ते ऐकत नव्हते. मग मी स्वत: उतरलो आणि त्यांना चला-चला असं म्हटलं. मात्र, यावरून ट्रोल झालं. आणखी एका सभेत मंत्री सतानाही काठी घेऊन लोक लोटले होते. तेव्हा तर देवेंद्र फडणवीस हे गाडीत वरती बसलेले होते. मात्र, यामध्ये ट्रोल होण्यासारखं काही नाही. पण मला ट्रोल केलं. मात्र, मी यामुळे मी थांबणार नाही. असे प्रसंग यापुढेही येतील. हा कार्यकर्त्यांचा स्वभाव आहे त्यामुळे त्यात बदल होणार नाही”, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.

Ashish Shelar Raj Thackeray
Ashish Shelar : अमित ठाकरेंनंतर भाजपाचा मनसेच्या आणखी एका उमेदवाराला पाठिंबा, कंबर कसून प्रचार करण्याचे आदेश
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Gautam Adani and sanjay raut
Sanjay Raut : “अदाणींविरोधात अटक वॉरंट, त्यांनी देशाला डाग लावलाय”, संजय राऊतांची टीका
Why aai kuthe kay karte fame rupali bhosale bought a new car
‘आई कुठे काय करते’ फेम रुपाली भोसलेने स्वतःसाठी नाही तर ‘या’ व्यक्तीसाठी खरेदी केली आलिशान गाडी, म्हणाली, “ती गाडी माझी नसून…”
How is the President of the United States elected Why is voting indirect
अमेरिकेचे अध्यक्ष कसे निवडले जातात? मतदान अप्रत्यक्ष का असते? समसमान मते मिळाल्यास काय? 
maharashtra assembly election 2024 bjp double standard for action against rebels
Jalgaon Vidhan Sabha Election 2024 : जळगावमध्ये बंडखोरांवरील कारवाईत भाजपचा दुजाभाव; माजी खासदारास अभय
Maharashtra Assembly Election 2024 _ BJP
Assembly Election: भाजपाने अखेर बंडखोरांना हिसका दाखवला; ४० नेत्यांवर उगारला कारवाईचा बडगा
sukanya mone reveals she got call from manoj joshi wife at midnight 2 pm
सुकन्या मोनेंना मध्यरात्री २ वाजता फोन केला अन् विचारलेलं…; ‘आभाळमाया’तील ‘त्या’ सीनमुळे मनोज जोशींच्या पत्नीवर झालेला परिणाम

हेही वाचा : Eknath Shinde : “बंद सम्राटांना कायमचं…”, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मुंबईच्या सभेतून इशारा

व्हिडीओवर दानवे काय म्हणाले?

“तुम्ही त्या व्यक्तीलाही विचारू शकता. अहमद नावाचा माझा मित्र आहे. आम्ही शेजारी राहतो. काय झालं माझं शर्ट मी जॅकेट घातल्यामुळे पाठिमागून अडकलं होतं. त्यामुळे त्याने ते दोन-तीन वेळेस ओढलं. त्यावर मी म्हटलं की राहुदे, पण त्याने काही ऐकलं नाही. मग त्याला बाजूला करावं म्हणून मी त्याला लोटलं. मग ती काय लाथ मारली का? लाथ मारली तर माणूस उठणार नाही. पण याला लाथ म्हणतात का? आता आपले एखाद्याशी मैत्रींचे संबंध असले तर आपण एकमेकांचे कान पकडतो. मग त्याला काय लाथ मारणं म्हणतात का?”, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं. ते टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहीनीशी बोलत होते.

कार्यकर्त्यानेही दिली होती प्रतिक्रिया

ज्या कार्यकर्त्याला लाथ बसली त्याचे नाव शेख अहमद आहे. शेख अहमद यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, “मी दानवे साहेबांचा जवळचा मित्र आहे. आमची मैत्री जवळपास तीस वर्षांपासूनची आहे. आज सकाळी व्हायरल झालेल्या बातमीत काहीही तथ्य नाही. लोक चिंधीचाही साप बनवतात. खोतकर दानवेंना भेटायला आले होते. त्यावेळी दानवेंचे शर्ट अडकले होते. ते काढण्यासाठी मी पुढे गेलो होतो. तेव्हा त्यांच्या हातामध्ये पुष्पगुच्छ असल्यामुळे त्यांनी तसे केले. मात्र त्या व्हिडीओमध्ये दिसते तसे काही नाही”, असं म्हटलं होतं.