काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली होती. नितीन गडकरी यांची जर भाजपमध्ये घुसमट होत असेल तर त्यांनी काँग्रेसमध्ये यावे, अशी ऑफर पटोले यांनी दिली होती. आता पटोले यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते संजय कुटे यांनी जोरदार टीका केली आहे. “काही दिवसांनी नाना पटोलेच भाजपमध्ये येतील”, असा दावा कुटे यांनी केला आहे. “मात्र आम्ही त्यांना पक्षात घेणार नसल्याचं” देखील ते म्हणाले आहेत.
हेही वाचा- “..तर काँग्रेसमध्ये या, आम्ही साथ देऊ”, नाना पटोलेंची नितीन गडकरींना थेट ऑफर
काय म्हणाले संजय कुटे
संजय कुटे यांनी नाना पटोलेंना जोरदार निशाणा साधला आहे. नाना पटोले यांची नितीन गडकरींबद्दल बोलण्याची कुवत नाही. काही दिवसांनी नाना पटोले हेच भाजपात येतील. पण आम्ही त्यांना पक्षात घेणार नाही तो भाग वेगळा. नाना पटोले यांनी यापूर्वीच भाजप दर्शन घेतले आहे. ते सतत इकडून तिकडे आणि तिकडून इकडे करत असतात. त्यामुळे भविष्यात ते भाजपमध्ये येऊ शकतात. मात्र आम्ही त्यांना पक्षात घेणार नाही असं कुटे यांनी म्हटलं आहे.
नाना पटोले यांनी काय म्हटलं होतं?
काही दिवसांपूर्वीच नाना पटोले यांनी नितीन गडकरी यांना काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली होती. गडकरी यांची भाजपामध्ये घुसमट होत असेल तर त्यांनी काँग्रेसमध्ये यावे. काँग्रेस हा लोकशाही माननारा पक्ष आहे. असं नाना पटोले यांनी म्हटलं होतं. काँग्रेस हा लोकशाही व्यवस्था मानणारा पक्ष आहे. त्यामुळेच काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत निवडणूक घेतली जाते, असे पटोले म्हणाले होते. तसेच देशात भाजपाविरोधात बोलणाऱ्यांच्या मागे ईडी, सीबीआय लावली जाते असा आरोपही त्यांनी पटोलेंनी केला आहे.