देशात लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता ४ जून रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्याआधी १ जून रोजी एक्झिट पोलचा अंदाज समोर आला. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार देशात पुन्हा एकदा एनडीएचं सरकार येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली. तर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात सुधीर मुनगंटीवार यांच्या पराभवाची शक्यता काही एक्झिट पोलने वर्तवली आहे. चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर विजयी होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

यासंदर्भात आता भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया देताना मोठं विधान केलं आहे. “चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी मी तयार नव्हतो. पण पक्षाचा आदेश आला आणि ही जागा लढवली”, असं सूचक वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलं. त्यांच्या या विधानाची आता चर्चा रंगली आहे. एबीपी माझाला बोलताना त्यांनी हे विधान केलं.

“बंडखोरी नव्हे हा तर उठाव,” ब्रिजभूषण पाझारे २४ तासांनंतर अवतरले अन्…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Atul Save, chandrakant khaire
ठाकरेंच्या बंडखोराची माघार, काँग्रेसऐवजी भाजपा सुखावली, अतुल सावेंनी थेंट खैरेंचे पाय धरले; औरंगाबादमध्ये काय घडतंय?
maharashtra vidhan sabha election 2024 path of Mahayuti and Mahavikas Aghadi is difficult due to major rebel candidates in akola and vashim
प्रमुख बंडखोरांमुळे महायुती व मविआची वाट बिकट
sada sarvankar marathi news (1)
“उद्धव ठाकरेंसारखा माणूस राजकारणात सापडणार नाही”, सदा सरवणकरांच्या नावाने पोस्ट व्हायरल; स्वत: स्पष्टीकरण देत म्हणाले…
Sada Sarvankar
Sada Sarvankar : “मला निवडणूक लढवावीच लागेल”, सदा सरवणकर हतबल; म्हणाले, “राज ठाकरेंनी माझी…”
maharashtra vidhan sabha election 2024 cm eknath shinde strict stance against rebels in shiv sena
तुम्ही कामाला लागा, महायुतीतल्या विरोधकांना मी बघून घेतो; बंडखोर आणि नाराजांबाबत मुख्यमंत्र्यांची कठोर भूमिका
Maharashtra assembly election 2024 BJP rebel Dadarao Keche moved out of Maharashtra
आर्वीत राजकीय भूकंप, भाजप बंडखोर दादाराव केचे यांना महाराष्ट्राबाहेर हलविले

सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?

“एक्झिट पोलचे अंदाच समोर आले, त्यावर बोलताना मुनगंटीवार म्हणाले, “आनंदाची गोष्ट आहे, एक्झिट पोलच्या सर्व्हेमधून जनतेच्या मनातील भावना व्यक्त झाली. मला वाटत की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासावर मतं मागितली. हा देश म्हणजे माझा परिवार आहे, या भावनेने त्यांनी काम केलं. या देशातील जनतेनं ४ जून रोजी पंतप्रधान मोदी यांच्या बाजूने कौल उभा केला तर देशाचा जास्त फायदा आहे”, असं मुनगंटीवार यांनी म्हटलं.

हेही वाचा : Maharashtra Exit Poll: “एक्झिट पोलनुसार निकाल लागला तर…”, वडेट्टीवारांनी व्यक्त केली शंका; म्हणाले, “काहीतरी गडबड…”

एक्झिट पोलच्या चर्चेमध्ये इंडिया आघाडी सहभागी होणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली होती. त्यावर बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “ते खूप घाबरले असतील. त्यामुळे त्यांनी तो निर्णय घेतला असेल. मात्र, अमित शाह यांनी म्हटलं होतं की, आम्ही कितीतरी पराभव सहन केले आहेत. मला वाटतं आमित शाह आणि पंतप्रधान मोदी यांची भूमिका समजून घेतली पाहिजे. शेवटी पक्षाचा विजय आणि पराभव यावर पक्षाचं भवितव्य अवलंबून राहत नाही. तर संघटना, विचार, पक्षाचं संघटन यावर अवलंबून असतं. त्यामुळे एखादा पराभव होतो. देशात अटल बिहारी वाजपेयी, इंदिरा गांधी यांनाही पराभवाला सामोर जावं लागलं होतं. मात्र, पराभवानंतरही त्यांनी नैतिकतेमध्ये कणभरही फरक पडू दिला नाही. पण राहुल गांधींना पराभव झाला की जाती दिसतात. पत्रकार परिषदेत ते जात विचारतात. मणिपूरमध्ये भारतमातेचा पराभव दिसतो. शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येतं. त्यामुळे ते मतदारांना खूप दिवस पचवेल असं वाटत नाही”, अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी इंडिया आघाडीवर केली.

चंद्रपूरबाबत सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?

“चंद्रपूरची जागा लढण्यासाठी मी तयारच नव्हतो. मात्र, जेव्हा पक्षाचा आदेश आला तेव्हा मी लढवली. १३ मार्च रोजी माझं तिकीट जाहीर झालं आणि १९ एप्रिलला मतदान झालं. या मतदारसंघात दोन जिल्हे आहेत. त्यामध्ये एक चंद्रपूर आणि अमरावती विभागाच्या यवतमाळमधील दोन विधानसभा मतदारसंघात माझा जास्त संपर्क नव्हता. पक्ष संघटना म्हणून कार्यकर्ते उत्साहाने काम करत होते. मी १६ मार्च १९९५ साली पहिल्यांदा निवडून आलो. तेव्हा ठरवलं की निवडून आलं पराभव झाला तर लाजायचं नाही. आपण जनतेच्या सेवेसाठी आहोत”, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं.