Sudhir Mungantiwar : विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटपही झालं. मात्र, महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात काही दिग्गज नेत्यांना डावलण्यात आल्याने काही नेते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात अद्यापही सुरु आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुतीतील तीनही पक्षांमध्ये असंतोषाचा भडका उडाला होता. छगन भुजबळ, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अजून काही नेत्यांना मंत्रीपद मिळालेलं नाही. छगन भुजबळ यांनी तर आपल्याला मंत्रिपद न मिळाल्यामुळे जाहीर नाराजी बोलून दाखवली. एवढंच नाही तर छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. तसेच भुजबळांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत पुढील भूमिकेबाबत संकेतही दिले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तसेच भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनाही मंत्रिमंडळात संधी न मिळाल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा होती. मात्र, त्यानंतर मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण देत आपण नाराज नसल्याचं म्हटलं होतं. दरम्यान, आता सुधीर मुनगंटीवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना सूचक विधान केलं आहे. ‘जीवनात काहीक्षण धुकं येत असतं, पण ते धुकं पर्मनंट नसतं’, असं सूचक वक्तव्य मुनगंटीवार यांनी केलं. त्यांच्या या विधानाचा अर्थ काय? याबाबत आता अनेकांनी तर्कवितर्क लावण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा : Uttam Jankar on Ajit Pawar: ‘अजित पवार २० हजार मतांनी पराभूत, महायुतीला फक्त १०७ जागा’, आमदार उत्तम जानकर यांचा खळबळजनक दावा; थेट EVM चं गणित मांडलं

सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?

“मी मुंबईतून नागपूरसाठी सकाळी विमानात बसलो. मात्र, अचानक काय झालं की मी नागपूरला उतरू शकलो नाही आणि विमानही उतरू शकलं नाही. कारण नागपूरमध्ये एवढं धुकं जमा झालं की ते विमान नागपूरला न उतरता विमानाचा पायलट थेट हैदराबादला घेऊन गेला. मग आमचं विमान हैदराबादला उतरलं. मग एक तासाने मेसेज आला की नागपूरचं धुकं सपलं, मग तेव्हा विमान पुन्हा नागपूरला आलं. जीवनाचंही असंच असतं. काहीक्षण धुकं येतं पण ते धुकं पर्मनंट नसतं. पुन्हा आपलं विमान उतरणार हे मात्र निश्चित असतं”, असं सूचक विधान सुधीर मुनगंटीवार यांनी केलं.