जितेंद्र आव्हाड यांनी श्रीराम यांच्या आहाराबाबत भाष्य केल्यानंतर त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या खुमासदार शैलीत उत्तर दिले. जितेंद्र आव्हाड यांची भाषा घसरत चालली आहे. त्यामुळे त्यावर अधिक काय बोलायचे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पण त्यांच्या अशा बोलण्याने ‘अंदर की बात है, आव्हाड अजितदादा के साथ है’, हे मात्र सिद्ध होत आहे. पवार साहेबांसह राहून अशी भाषा वापरून जे त्यांच्या गटात जे काही दोन-चार लोक राहिले आहेत, त्यांनाही संपविण्याचा प्रयत्न ते करत आहेत, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली. हा रामभक्तांचा देश आहे. बरं झालं आव्हाड अजून बाथरुमपर्यंत आलेले नाहीत, अशीही प्रतिक्रिया देत मुनगंटीवार यांनी आव्हाड यांना टोला लगावला. नागपूर येथे माध्यमांशी बोलत असताना मुनगंटीवार यांनी विविध विषयांबाबत चौफेर फटकेबाजी केली.

“मी काय चुकीचं बोललो की हत्या करण्यापर्यंत पोहोचला, तुम्ही माझ्याशी…”, जितेंद्र आव्हाडांचं आव्हान

राम मंदिर उद्घाटनाला कोणताही आमदार जाणार नाही

अयोध्येत निर्माणाधीन असलेल्या राम मंदिराचे २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन होत आहे. याच दिवशी श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. यासाठी देशभरातून हजारो लोकांना निमंत्रित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातूनही काही लोकांना निमंत्रित करण्यात आले आहे. तसेच निमंत्रणाच्या मानपानावरून टीका-टिप्पणीही झालेली पाहायला मिळाली. भाजपाचे किती आमदार या सोहळ्यासाठी जाणार? असा प्रश्न कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विचारण्यात आला होता. २२ जानेवारी रोजी कोणताही आमदार अयोध्येत जाणार नाही. २५ जानेवारी नंतर अयोध्येत जाता येणार आहे, असे ते म्हणाले.

सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले की, २५ जानेवारी नंतर एखाद्या जिल्ह्यातून भाविकांनी मागणी केल्यास विशेष रेल्वे उपलब्ध करून दिली जाईल. पण त्यासाठी आगाऊ पैसे रेल्वेला द्यावे लागतील. हा देश राम भक्तांचा आहे. त्यामुळे वेळ मिळेल, तसे प्रत्येकजण अयोध्येत जाईलच. त्यावर आताच कधी जाणार अशी चर्चा करण्यात काही अर्थ नाही. राम मंदिराला जितके दरवाजे आहेत, त्याचे लाकूड चंद्रपूरातून गेलेले आहे. जगातील कोणताही भक्त त्या दरवाजातून जाईल, तेव्हा त्याला चंद्रपूरच्याच लाकडाचा दरवाजा ओलांडावा लागेल, असेही मुनगंटीवार म्हणाले.

“जितेंद्र आव्हाडांनी मुंब्र्यात जाऊन औरंगजेब, अफझल खान यांची…”, श्रीकांत शिंदेंचा खोचक सल्ला

दिल्लीत थंडी माझ्याकडे स्वेटर नाही

आगामी लोकसभेसाठी काही आमदारांना निवडणुकीत उतरविण्याची चर्चा आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाचा विचार होत असल्याबाबतचा प्रश्न माध्यमांनी विचारला असता मुनगंटीवार यांनी मिश्किल शैलीत उत्तर दिले. ते म्हणाले, आमच्या पक्षातील बातम्या आम्हाला कळण्याऐवजी माध्यमांना कशा कळतात? पण यात काही तथ्य नाही. मी महाराष्ट्रातच राहणार आहे. यावर पत्रकार म्हणाले की, तुम्हाला दिल्लीत जाण्यात रस दिसत नाही. त्यावर मुनगंटीवार म्हणाले की, तिथे थंडी खूप असते आणि माझ्याकडे स्वेटर नाही.

Story img Loader