Sujay Vikhe Patil : विधानसभेची निवडणूक जवळ आल्यामुळे अनेक नेत्यांनी कंबर कसली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमधील नेते कामाला लागले आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक नेत्यांनी मतदारसंघातील आपले दौरे वाढवले आहेत. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून बैठकींचा धडाका लावला आहे. कोणत्या मतदारसंघातून कोण निवडणूक लढणार? याबाबत नेत्यांमध्ये खलबतं सुरु आहेत. अशातच अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामधून पराभव झालेले भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार सुजय विखे पाटील हे आता विधानसभा लढवण्याच्या तयारीला लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

सुजय विखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी विधानसभेची निवडणूक लढवण्याबाबत सूचक भाष्य करत संगमनेर किंवा राहुरी मतदारसंघातून इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा सुजय विखे यांनी आपल्याला पक्षाने संधी दिल्यास संगमनेरमधून विधानसभा लढवायला आवडेल, असं मोठं विधान आज (१६ सप्टेंबर) माध्यमांशी बोलताना केलं आहे. त्यामुळे संगमनेरमध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना सुजय विखे हे थेट आव्हान देणार असल्याचं बोललं जात आहे.

Chhagan Bhujbal On Mahayuti
Chhagan Bhujbal : अजित पवारांनी महायुतीत किती जागा मागितल्या? छगन भुजबळांनी आकडाच सांगितला; म्हणाले…
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
nana Patole sanjay gaikwad
Sanjay Gaikwad : “संजय गायकवाडच्या तोंडाला आवर घाला नाहीतर…”, नाना पटोलेंचा एकनाथ शिंदेंना इशारा
Ajit Pawar Amol Kolhe
Amol Kolhe : अजित पवार म्हणाले, “आता आपणच साहेब”, अमोल कोल्हे प्रत्युत्तर देत म्हणाले, “राज्यात दोनच साहेब, एक शरद पवार, दुसरे…”
Narhari Zirwal
Narhari Zirwal : “गोकुळला जयंत पाटलांच्या भेटीसाठी मीच पाठवलेलं”, नरहरी झिरवाळांचा मोठा खुलासा, म्हणाले…
Narendra Modi Subhash Desai
Narendra Modi : “मला ८४ हजारांची पेन्शन मिळते, मोदींना किती रुपये मिळतील माहितीय का?”, सुभाष देसाईंनी सगळी आकडेवारी मांडली
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान

हेही वाचा : Sharad Pawar : स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत शरद पवारांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र; भेटीची वेळ मागत म्हणाले…

सुजय विखे काय म्हणाले?

“निळवंडे धरणाचं काम झाल्यामुळे निळवंडेचं पाणी सर्व गावांमध्ये गेलं आहे. खरं तर निळवंडे धरणाच्या पाण्याचा लाभ हा संगमनेर आणि राहाता तालुक्यातील लोकांना होत आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जर भारतीय जनता पक्षाने आदेश दिला आणि जर पक्षाला जी जागा सुटली तर नक्कीच मला संगमनेरमधून विधानसभेची निवडणूक लढवायला आवडेल. यामध्ये पक्ष संघटनेचा जो काही आदेश राहील, त्या आदेशाला बांधिल राहून काम करत राहू”, असं सुजय विखे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सुजय विखे पाटील यांनी विधानसभेची निवडणूक लढवण्याबाबत काही दिवसांपूर्वी राहुरी मतदारसंघातून इच्छा व्यक्त केली होती. त्याबाबत त्यांना प्रश्न विचारला की, मागणी राहुरीची आहे आणि तुम्ही संगमनेर विधानसभा निवडणूक लढवण्याचं म्हणत आहात? या प्रश्नावर बोलताना सुजय विखे म्हणाले, “मी असाच आहे, ज्या ठिकाणी मागणी असते, त्या ठिकाणी मी जात नाही”, असं सुजय विखे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानाचा अर्थ नेमकी काय? याबाबतही आता तर्कवितर्क लावले जात आहेत.

सुजय विखेंची उद्धव ठाकरेंवर टीका

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर टीका करताना महायुती सरकारला आता घरी बसवा, असा हल्लाबोल एका सभेत बोलताना केला होता. त्यांच्या टीकेला आता माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी प्रत्युत्तर देत खोचक टीका केली आहे. “घरी बसलेल्यांना वाटतं की सर्वांनीच घरी बसावं. ते विश्रांती घेत आहेत, आता पुन्हा त्यांना विश्रांती देऊ”, अशी टीका सुजय विखेंनी केली.