वाई: सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीसाठी खासदार उदयनराजे भोसले मागील दोन दिवसांपासून दिल्लीत आहेत. मात्र अजूनही त्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत भेट शुक्रवारी सायंकाळ पर्यंत झालेली नाही. याबाबत त्यांचे निकटवर्तीय व सातारा लोकसभेचे संयोजक सुनील काटकर यांनी माहिती दिली. उदयनराजे यांना अमित शाह यांची भेट मिळत नाही, या केवळ अफवा आहेत. आम्हाला मुंबईत ज्यांना भेटायचं होतं त्यांना आम्ही भेटलेलो आहोत. आतापर्यंत भारतीय जनता पक्षाच्या २० मतदारसंघांची यादी जाहीर झालेली आहे. अजून २८ मतदारसंघातील उमेदवारांची यादी जाहीर झालेली नाही. त्यामुळे उरलेल्या २८ जागा या पुढील एक-दोन दिवसांत जाहीर होतील. महायुतीमध्ये तीन घटक पक्ष असल्याने उमेदवारी जाहीर होईपर्यंत वेगवगेळ्या गोष्टी घडणार आहेत. अजून वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत, असे सुनील काटकर यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : “पापी पेट का सवाल…”, केंद्रीय यंत्रणांची बाजू घेत सुप्रिया सुळेंची पंतप्रधान मोदींवर टीका

Aditi Tatkare, Ladki Bahin Yojana, Ladki Bahin Yojana Fund, Fund Issue, Aditi Tatkare Pune,
लाडक्या बहीण योजनेसाठी इतर कोणत्याही विभागाचा निधी वळविण्यात आलेला नाही – मंत्री आदिती तटकरे
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Recruitment of various posts in the State Government Service of the State Public Service Commission MPSC
एमपीएससीच्या तेवीस परीक्षांसाठी पुन्हा अर्जाची संधी, तुम्ही अर्ज केला नसेल तर…
satish wagh murder case mohini wagh and 5 others remanded to police custody till 30 december
खून करण्यामागे कारण आर्थिक की अनैतिक संबंध? सतीश वाघ खून प्रकरणात पत्नीला पोलीस कोठडी
Underground sewage Scheme , Sulabha Khodke ,
अमरावती : आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली… ‘हे’ आहे कारण
Government Nursing Training School , Bhandara ,
भंडारा : गुण वाढवण्यासाठी प्राचार्यांनी विद्यार्थिनींकडे केली शरीरसुखाची मागणी
Evidence that Vishal Gawli of Kalyan is mentally ill kalyan news
कल्याणच्या विशाल गवळीकडे मनोरुग्ण असल्याचे दाखले;  याच आधारावर यापूर्वी जामीन मिळविल्याची माहिती
loksatta editorial centre to end no detention policy for students in classes 5 and 8 in schools
अग्रलेख: नापास कोण?

सुनील काटकर पुढे म्हणाले, उदयनराजे कमळाच्या चिन्हावरच लढतील. त्यांना कोणीही विरोध केलेला नाही. उलट उदयनराजेंची एकमताने सगळ्यांनी शिफारस केली आहे. आमदार, जिल्हाध्यक्ष अन्य पदाधिकारी या सर्वांनी पक्षाला सातारा लोकसभेची जागा मिळाली पाहिजे, अशीच इच्छा व्यक्त केली आहे. दोन दिवसांत ती जाहीर होईल. उदयनराजे यांना अमित शाह यांची भेट मिळत नाही, या सर्व अफवा आहेत. आता आम्हाला मुंबईत ज्यांना भेटायचं होतं त्यांना आम्ही भेटलेलो आहोत. मुंबईमध्ये उदयनराजेंना कोणाला भेटायचं असेल तर त्यांची वेळ मागून जावं लागत नाही. त्यांना कोणत्या वेळेची मर्यादा नसते. योग्य वेळी योग्य सर्व भेटी होतात. थोडं वाट बघणं उचित ठरेल. या सर्व गोष्टींना उद्या दुपारपर्यंत पूर्णविराम मिळेल. छत्रपतींचा गनिमी कावा सर्वांना माहित आहे. त्यांनी कधीही कोणाशी दगाफटका केला नाही. त्यामुळे त्यांनाही कधी दगा फटका होणार नाही असे सुनील काटकर म्हणाले. साताऱ्याच्या जागेवरुन महायुतीत जोरदार रस्सीखेच आहे. भाजपाची उमेदवारी उदयनराजेंनाच मिळणार असा विश्वास कार्यकर्त्यांना आहे.

Story img Loader