वाई: सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीसाठी खासदार उदयनराजे भोसले मागील दोन दिवसांपासून दिल्लीत आहेत. मात्र अजूनही त्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत भेट शुक्रवारी सायंकाळ पर्यंत झालेली नाही. याबाबत त्यांचे निकटवर्तीय व सातारा लोकसभेचे संयोजक सुनील काटकर यांनी माहिती दिली. उदयनराजे यांना अमित शाह यांची भेट मिळत नाही, या केवळ अफवा आहेत. आम्हाला मुंबईत ज्यांना भेटायचं होतं त्यांना आम्ही भेटलेलो आहोत. आतापर्यंत भारतीय जनता पक्षाच्या २० मतदारसंघांची यादी जाहीर झालेली आहे. अजून २८ मतदारसंघातील उमेदवारांची यादी जाहीर झालेली नाही. त्यामुळे उरलेल्या २८ जागा या पुढील एक-दोन दिवसांत जाहीर होतील. महायुतीमध्ये तीन घटक पक्ष असल्याने उमेदवारी जाहीर होईपर्यंत वेगवगेळ्या गोष्टी घडणार आहेत. अजून वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत, असे सुनील काटकर यांनी म्हटले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा