सत्ता नसली की माणसाचे संतुलन बिघडते, भाजपची तशी परिस्थिती झाली आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते. भाजपाचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस बिजू अण्णा प्रधाने, माजी नगरसेवक सुभाष डांगे, माजी नगरसेविका मंदाकिनी तोडकरी, सुनील भोसले, किशोर पाटील, सुरेश पाटील यांनी सोमवारी रात्री राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला.

मोहोळ विधानसभा मतदारसंघातील सभेत जयंत पाटील यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला. त्यानंतर रात्री बारा वाजता करेक्ट कार्यक्रम करत भाजपाच्या शिलेदारांना राष्ट्रवादीत प्रवेश दिला.

Arjuni Morgaon Constituency , Ajit Pawar, Manohar Chandrikapure,
विदर्भात अजित पवारांची भाजपकडून कोंडी
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Kothrud Assembly Constituency Assembly Election 2024 Division of Hindutva votes between BJP Shiv Sena Thackeray and MNS Pune news
‘सुरक्षित’ असूनही भाजपची कसोटी
Pankaja Munde At Rally In Parali Beed.
“डोळ्यांसमोर कमळ येईल, पण तुम्ही घड्याळाचेच बटन दाबा…” धनंजय मुंडेंच्या समोरच काय म्हणाल्या पंकजा? पाहा व्हिडिओ
bjp leader shivray Kulkarni
भाजपचे नाव घेणाऱ्यांनी गल्लीबोळात भाजपविरोधात बैठकी…भाजप प्रवक्त्यांच्या आरोपामुळे…
Chhagan Bhujbal statement that he is involved in power for development
ईडीमुळे नव्हे, तर विकासासाठी सत्तेत सहभागी; छगन भुजबळ यांची सारवासारव
kalyan east shinde shiv sena city chief mahesh gaikwad including nine expelled from shiv sena
कल्याण पूर्वेतील बंडखोर शहरप्रमुख महेश गायकवाड; यांच्यासह नऊ जणांची शिवसेनेतून हकालपट्टी
sangli prithviraj patil
सांगलीतील काँग्रेसअंतर्गत बंडखोरीमागे षडयंत्र, पृथ्वीराज पाटील यांची बंडखोरांसह भाजपवर टीका

सोलापुरातील राजकीय प्रवेशाची राज्यात चर्चा; रात्री १२ वाजता भाजपा नेत्याचा जयंत पाटलांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

“प्रत्येक आमदाराला हाताळून सरकार पाडण्याचा प्रयत्न भाजपाने केला, मात्र १७० आमदारांच्या जोरावर सरकार मजबूत उभे आहे आणि महाराष्ट्रात परिवर्तन घडवत आहे,” असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले.

“बिजू अण्णा ज्या भाजप पक्षात काम करत होते तिथे कार्यकर्त्यांना गरजेपुरते वापर करण्याची प्रथाच आहे. कार्यकर्त्यांकडून काम करून घेणे आणि गरज संपली की कार्यकर्त्याला सोडून देणे ही प्रथा राष्ट्रवादीत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सर्वांनाच योग्य वागणूक मिळते,” असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

“भाजपाच्या अनेक लोकांच्या मनात पक्ष सोडण्याची तयारी आहे. बिजू अण्णा यांच्या पावलावर पाऊल ठेवून आता अनेकजण राष्ट्रवादीत येण्याचा निर्णय घेतील. सोलापूर जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस काम करेल. येत्या मनपा निवडणुकीत आपल्याला चांगले यश मिळवून हे काम करायचे आहे,” असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.

रात्री १२ वाजता पार पडला पक्षप्रवेश

आगामी सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सोलापूर भाजपाचे शहर सरचिटणीस बिजू प्रधाने राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत. मात्र राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी त्यांना तब्बल पाच तास वाट पहावी लागली. जयंत पाटील पोहोचल्यानंतर रात्री १२ वाजता हा पक्षप्रवेश पार पडला आणि अखेर ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते झाले. सोलापुरातील बाळे येथे हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला.

झालं असं की, सांगलीचे वीर जवान शाहिद रोमित चव्हाण यांच्यावर सोमवारी अंत्यसंस्कार पार पडले. या अंत्यसंस्काराला उपस्थित असल्याने जयंत पाटील यांना उशीर झाला आणि सोलापूर दौऱ्यातील सर्व कार्यक्रम उशिरा पार पडले.

यासंबंधी बोलताना जयंत पाटील यांनी सांगितलं की, “भाजपातून काही प्रमुख कार्यकर्ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार होते. त्यांनी मला येथे येण्यासाठी विनंती केली होती. पण माझ्या मतदारसंघातील एका जवानाला वीरमरण आलं आहे. त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थिती लावल्याने मला येथे येण्यास उशीर झाला. ७ वाजताच हा कार्यक्रम होणार होता, पण उशीर झाला”. दरम्यान राज्यात नेत्यांकडून सुरु असलेल्या आरोप प्रत्यारोपांवर बोलताना त्यांनी क्रिया केल्यावर प्रतिक्रिया येतेच असं म्हटलं.