शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘आवाज कुणाचा’ या शिवसेनेच्या पॉडकास्टमध्ये खासदार संजय राऊत यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपाला लक्ष्य केलं होतं. आता भाजपाने उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. स्वत:च्या नाकर्तेपणाला भावनांची झालर लावणाऱ्या उद्धव ठाकरेंनी मुलाखतीत व्हिक्टिम कार्ड खेळलं, अशी टीका भाजपाने केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपा महाराष्ट्रने एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. त्या व्हिडीओवर लिहिलं की, “घरात बसून टोमणे कोणालाही मारता येतात. हिंमतवान लोक समोरासमोर येऊन चर्चा करतात.”

तर व्हिडीओत म्हटलं की, “उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी नुकतीच स्वत:च्याच पॉडकास्ट चॅनेलला मुलाखत दिली. तेही स्वत:ला विश्वगुरू मानणाऱ्या संजय राऊत यांना. हे म्हणजे माझाच बॉल, माझीच बॅट आणि माझेच मैदान असं आहे. बॉल टाकणारा भिडूही माझाच, म्हणजे विकेट पडण्याचा सवालच नाही.”

हेही वाचा : “चिन्ह राहिलं नाही तरी…”, ‘घड्याळा’बाबत रोहित पवार यांचं मोठं विधान

“सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्वाशी प्रतारण केली”

“घरात बसून मुख्यमंत्रीपद सांभाळणाऱ्या नव्हे, तर मुख्यमंत्रीपद उपभोगणाऱ्या नेत्याकडून दुसरी कोणती अपेक्षा करणार? स्वत:च्या नाकर्तेपणाला भावनांची झालर लावणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीत व्हिक्टिम कार्ड खेळलं. पण, उद्धव ठाकरे यांनी जनतेला मुर्ख बनवण्याचा प्रयत्न करू नये. कारण, जनतेच्या मनातही अनेक प्रश्न सतावत आहेत. सत्तेसाठी तुम्ही बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्वाशी प्रतारण केली, तेव्हाच जनतेचा तुमच्यावरील विश्वास संपला,” असा हल्लाबोल भाजपाने उद्धव ठाकरेंवर केला आहे.

“…तीच मंडळी देशभक्त वाटू लागली आहे”

“आताही उद्धव ठाकरे राहुल गांधींचे गोडवे गात आहेत. हे तेच राहुल गांधी आहेत, ज्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर शाब्दिक हल्ले केले. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हिंदुत्वाचा अपमान करणारे, आता तुम्हाला गोड वाटू लागले आहेत. स्वातंत्र्यानंतर यांच्या सत्तापिपासू पिढ्यांनी जनतेची प्रगती आणि विकास शोषून घेतला. तीच मंडळी देशभक्त वाटू लागली आहेत,” असे टीकास्र भाजपाने उद्धव ठाकरेंवर सोडलं आहे.

“उद्धव ठाकरेंनी वडिलांचे विचार, भाजपाशी मित्रत्वाचे नाते डावलले”

“सोनिया गांधींना परदेशी म्हणून हिणावलं, त्या तुम्हाला जवळच्या वाटू लागल्या आहेत. उद्धव ठाकरे इतके सत्तांध झालेत की, महाराष्ट्रातील जनतेचा कौल डावलला आणि आजही डावलत आहेत. स्वत:च्या वडिलांचे विचार, भाजपाशी मित्रत्वाचे नाते उद्धव ठाकरेंनी डावलले. आणि मुख्यमंत्रीपद भोगताना जनतेचा विश्वासही तोडला,” असा आरोपही भाजपाने उद्धव ठाकरेंवर केला आहे.

हेही वाचा : “भविष्यात अजित पवार निश्चित मुख्यमंत्री झाले पाहिजेत, पण…”, शिंदे गटातील नेत्याचं विधान

“अडीच वर्षांच्या कार्यकाळात विकास कामे का थांबवली?”

“उद्धव ठाकरेंनी घरात बसून मुलाखती झोडण्यापेक्षा हिंमत असेल, तर समोर या. चर्चा करा आणि मुंबईकरांच्या प्रश्नांची उत्तर द्या. अडीच वर्षांच्या कार्यकाळात विकास कामे का थांबवली? त्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करणार का? मुंबईला काय घातक आहे? मुंबई महापालिका निवडणुका कोण न्यायालयात गेल्याने रखडल्या आहेत? मुंबईला कोणी किती वर्षे लुटलं? मुंबईतून काय बाहेर गेलं आणि काय आलं? क्रिकटचे सामने मुंबई बाहेर खरंच जाणार का? मुंबईकरांच्या अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे उद्धव ठाकरेंना द्यावी लागणार आहे. बातोसो सिर्फ वक्त गुजरता है, काम करने के लिए बाहर निकलना जरुरी है,” असा टोलाही भाजपाने उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp maharashtra attacks uddhav thackeray in interview aavaj kunacha ssa
Show comments