BJP Micro Planning for Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : यंदा भाजपाने निर्विवाद यश मिळवून १३२ जागांवर विजय मिळवला. २०१४ सालचा त्यांचा रेकॉर्ड त्यांनी मोडला. लोकसभेला आलेलं अपयश अन् विधानसभेतील भरारी यामध्ये अनेक मायक्रो प्लानिंगचा जय झाला आहे. बुथ टू बुथ मार्केटिंग करत भाजपाने लोकसभेतील पराभव विधानसभेत कसा मोडून काढला याबाबत भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे यांनी एबीपी माझाशी संवाद साधला आहे.

लोकसभेच्या निकालानंतर लक्षात आलं की काँग्रेसने आरक्षणासंदर्भात नेरेटिव्ह सेट केले होते. त्यावर उत्तर कसं द्यायचं ही मोठी समस्या होती. आदिवासी, दलित समाजातील काही घटकांना सांगण्यात आलं होतं की आरक्षण हटवणार आणि संविधान बदलणार. या नरेटिव्हसाठी काँग्रेस जबाबदार होती. भाजपाने राज्यात विजयी व्हावं याकरता लोकसभेनंतरच कंबर कसली. प्रशिक्षण घेण्यात आलं. फेक नरेटिव्हला उत्तर कसं द्यायचं, याचं प्रशिक्षण देण्यात आलं. आरक्षण काढणार नाही, संविधान बदलणार नाही ही भाजपाची भूमिका लोकांपर्यंत पोहोचवणं प्रमुख काम होतं, असं संजय भेंडे म्हणाले.

हेही वाचा >> Maharashtra Vidhan Sabha Election Result Live Updates : राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सत्तास्थापनेचं घोडं कुठे अडलं?

बुथ मॅनेजमेंट कसं केलं?

बुथ मॅनेजमेंट हा विषय आहे. ज्या बुथवर भाजपाला मोठ्या प्रमाणावर मते मिळतात त्याचं प्रमाण कसं वाढवायचं यावर विचार केला गेला. यात आम्ही सफल झालो. १५ ते २० टक्के बदल यात झाला. जिथे ५० ते ६० टक्के वोटिंग होत होतं तिथे ७५ टक्क्यांपर्यंत पोहोचता आलं. यात शहर आणि ग्रामीण भागातही हा फरक जाणवला”, असं ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, बुथसाठी ए, बी, सी आणि डी अशा कॅटगिरी करण्यात आल्या. जिथे कमजोर बुथ होते, तिथेही प्रयत्न केले. कठीण काम होतं. तिथेही कार्यकर्ते घरोघरी जाऊन प्रयत्न करत होते. बुथ मॅनेजमेंट केल्याने बुथ वोटिंगचं प्रमाण वाढलं. यातच यादी वाचन हा मोठा कार्यक्रम होता. यादीतील प्रत्येकाकडे जाऊन त्यांना विनवणी करण्यात आली. यासाठी मायक्रो लेव्हलला प्लानिंग केलं. प्रत्येक पानावर ३० मतदारांची यादी होती. प्रत्येक घरात जाऊन घरच्या लोकांशी बोलणं, भाजपाचा संदेश पोहोचवणं, केंद्र आणि राज्याने केलेली कामं पोहोचवणं यातून मतदारांना विनवणी केली गेली. ही कामं बुथ अध्यक्षांनी केली, त्यामुळे आम्ही या निवडणुकीत मोठा विजय संपादन करू शकलो.”

डी बुथमधील लोकांना सीमध्ये आणणं मोठं काम होतं. कारण, डीमधील लोकांची विचारसरणी ठरलेली असते. त्यामुळे तिथून मतं मिळत नाहीत किंवा अल्पप्रमाणात मिळतात. अल्पसंख्याक, दलित वस्त्या मोठ्या प्रमाणात आहेत, या सर्व वस्त्यांमध्ये सांगणं मोठं काम होतं. डीमधून सीमध्ये आणणं कठीण काम होतं. डीमधून सीमध्ये कन्वर्टमध्ये कठीण काम होतं.

अपग्रेडेशन करावं, डीमधून सीमध्ये आणणं मोठं काम आहे. कारण माईंड सेट झालेला आहे की तिथून मतं, मिळत नाही किंवा अल्पप्रमाणात मिळतात. अल्पसंख्याक दलित वस्त्या मोठ्या प्रमाणात आहेत, या सर्व वस्त्यांमध्ये सांगणं मोठं काम होतं. डीमधून सीमध्ये कन्वर्टमध्ये कठीण काम होतं. पण बीमधून ए आणि ए मधून ए प्लसम मध्ये जाण्यात ६० टक्के यश आलं. लोकसभेत आलेलं कमी यश, यातून धडा घेऊन कार्यकर्ता घरोघरी गेला. लोकल कार्यकर्त्यांच्या मदतीने आम्हाला अधिक मते मिळवण्यात यश आलं.