ललित पाटीलला जेव्हा अटक झाली तेव्हा उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली तेव्हा तो शिवसेनेचा पदाधिकारी होता. ललित पाटीलशी काय कनेक्शन आहे ते ठाकरे गटाने उघड केलं पाहिजे. महाराष्ट्र पोलिसांनी नाशिक, सोलापूरचे त्याचे कारखाने उद्ध्वस्त केले तेव्हा शिवसेनेने मोर्चा काढला. ठाकरे गट अशाच वेळी मोर्चा काढतो जेव्हा कारवाई होते असं म्हणत भाजपा आमदार देवयानी फरांदे यांनी ललित पाटील प्रकरणावर भाष्य केलं आहे. तसंच संजय राऊत हे मनोरुग्ण झाले आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत हे ड्रग्ज घेत असावेत

संजय राऊत हे बहुदा मनोरुग्ण झाले असावेत म्हणूच सकाळी उठून काहीही वक्तव्यं ते करतात. दुसरी शक्यता अशी आहे की कदाचित तेच ड्रग्ज घेत असावेत असं आम्हाला वाटू लागलं आहे. ललित पाटील प्रकरणात त्यांचं (संजय राऊत) खूप नुकसान झालेलं दिसतंय. त्यामुळेच ते बेताल वक्तव्यं करत आहेत असं देवयानी फरांदे म्हणाल्या. तसंच उद्धव ठाकरेंच्या सेनेला आणि संजय राऊत यांना ललित पाटील हफ्ते पोहचवत होता का? असाही प्रश्न देवयानी फरांदेंनी विचारला आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हे पण वाचा- “ललित पाटील अजूनही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत, सर्वज्ञानी संजय राऊत यांनी..”; नीलम गोऱ्हेंचा गंभीर आरोप

आणखी काय म्हणाल्या देवयानी फरांदे?

नाशिकमध्ये ड्रग्ज प्रकरणाविरोधात शिवसेना ठाकरे गटाचा भव्य मोर्चा आहे. संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. त्याआधी संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोपही केले. नाशिक जिल्ह्यातील सहा आमदारांना हफ्ते जात होते का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. ललित पाटील प्रकरणांमध्ये जे काही आरोप केलेले आहेत, त्या सगळ्या संदर्भात भाजपच्या नेत्या देवयानी फरांदे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप करण्यापेक्षा तुमचं सरकार होतं त्यावेळी तुम्ही कुठल्याही ड्रग्ज विकणाऱ्या माणसाला अटक करू शकला नाहीत. त्यामुळे ड्रग्जवाल्यांना कोण पाठीशी घालतंय की उद्धव बाळासाहेब ठाकरेंची गँग त्यांना पाठिशी घालते आहे हे बघावं लागणार आहे असंही देवयानी फरांदे म्हणाल्या.

हे पण वाचा- Lalit Patil : ललित पाटील कोण आहे? छोटा राजन गँगच्या गुंडांशी संपर्कात येत कसा झाला ड्रग माफिया?

ललित पाटील शिवसेनेचा पदाधिकारी आहे. त्यामुळे ललित पाटीलकडून संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंच्या सेनेला हफ्ते जात होते का? गृहमंत्र्यांना भांग घेता का अशा पद्धतीने विचारणाऱ्या संजय राऊत यांना माझा प्रश्न आहे की तुम्हीच कदाचित ड्रग्ज घेता का? महाराष्ट्र पोलीस हे या प्रकरणांत योग्य कारवाई करत आहेत असंही देवयानी फरांदे म्हणाल्या.

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकचा ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त केल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना ही बेताल वक्तव्यं करायला लागलेली आहे. गृहमंत्री जर हातबल असते तर नाशिकचा कारखाना उघडकीस आला नसता, सोलापूरचा कारखाना उघडकीस आला नसता. ठाकरे सेनाच हतबल झाली आहे, जेव्हा त्यांनी काँग्रेसची हात मिळवली केली, जेव्हा त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं. यांनी तीन वर्षांमध्ये किती ड्रग्ज कारखान्यांवर कारवाई केली? असाही प्रश्न फरांदे यांनी विचारला आहे.

Story img Loader