सलीम कुट्टावरून राज्यातील वातावरण तापलं आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांना सलीम कुट्टावरून लक्ष्य केलं आहे. “माझ्यावर आरोप झाले, तेव्हा पक्षानं माझा राजीनामा घेतला होता. आता फोटोच्या माध्यमातून गिरीश महाजनांचा सलीम कुट्टाशी संबंध दिसत आहे. त्यामुळे गिरीश महाजनांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा,” अशी मागणी खडसेंनी केली होती. याला गिरीश महाजनांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

एकनाथ खडसे काय म्हणाले?

“तथ्य नसताना सुद्धा माझ्यावर दाऊदच्या बायकोबरोबर संभाषण झाल्याचा आक्षेप घेण्यात आला होता. त्यानंतर माझी चौकशी करण्यात आली होती. आता फोटोच्या माध्यमातून गिरीश महाजनांचा सलीम कुट्टाशी संबंध दिसत आहे. देशद्रोहींशी गिरीश महाजनांचा सरळ संबंध आहे का?” असा सवाल खडसेंनी उपस्थित केला.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

“गिरीश महाजनही वॉशिंगमशीन मधून स्वच्छ होऊन बाहेर येतात की काय?”

“माझ्यावर आरोप झाल्यावर पक्षानं माझा राजीनामा घेतला होता. आता गिरीश महाजनांवर देशद्रोहाचे आरोप होत आहेत. ते पुराव्यानिशी समोर देखील येत आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळात असताना गिरीश महाजनांची चौकशी कशी होऊ शकेल? गिरीश महाजनांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. पण, भाजपाच्या भूमिकेप्रमाणे गिरीश महाजनही वॉशिंगमशीन मधून स्वच्छ होऊन बाहेर येतात की काय,” असा टोलाही खडसेंनी लगावला आहे.

“खडसेंच्या सगळ्या मालमत्तेवर जप्ती”

यावर बोलताना गिरीश महाजन म्हणाले, “दाऊदचा आरोप झाल्यानं खडसेंचा राजीनामा घेतला नाही. तर, पक्षात राहून चोऱ्या केल्या, आर्थिक घोटाळे केले म्हणून खडसेंना काढून टाकण्यात आलं. एकनाथ खडसे वैफल्यग्रस्त झाले आहेत. भोसरी एमआयडीची प्रकरणात खडसेंच्या सगळ्या मालमत्तेवर जप्ती आणली आहे. ८४ एकरमधील सगळा मुरूमही खडसेंनी विकून टाकला आहे. याप्रकरणी एसआयटी नेमली असून, १३७ कोटींचा दंड खडसेंना झाला आहे.”

“खडसेंच्या आरोपांना किंमत देत नाही”

“आता एकनाथ खडसेंची परिस्थिती केविलवाणी झाली आहे. त्यामुळे खडसेंना काय बोलावं-काय बोलू नये हे कळत नाही. म्हणून ते बेछूट आरोप करत आहेत. खडसेंच्या आरोपांना किंमत देत नाही,” अशी टीका गिरीश महाजनांनी केली आहे.

Story img Loader