भाजपा आमदार गोपीचंद पडळकर धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. ते ‘धनगर जागर यात्रे’च्या माध्यमातून राज्यभर फिरत आहेत. दरम्यान, ते सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करताना दिसत आहेत. आता त्यांनी एसटीडी अर्थात साहेब, ताई आणि दादा उल्लेख करत पुन्हा एकदा पवार कुटुंबीयांना लक्ष्य केलं आहे. ते पुण्यातील कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी उपस्थित लोकांना उद्देशून गोपीचंद पडळकर म्हणाले, “तुम्हाला कितीही गुलामगिरीची जाणीव करून दिली, तरी तुम्ही बंड का करत नाही? तुम्ही पेटून का उठत नाही? तुम्हाला राग का येत नाही? तुमच्या तळपायाची आग मस्तकात का जात नाही? तुम्ही आणखी किती दिवस STD च्या नादी लागणार? एसटीडी म्हणजे काय? एस म्हणजे साहेब, टी म्हणजे ताई आणि डी म्हणजे दादा. एसटीडीच्या गुलामगिरीतून तुम्ही बाहेर पडा. एक दिवस तुम्ही राजा व्हाल. हे साहेब, ताई, दादा म्हणणं सोडून द्या. इंग्रजांच्या काळात गुलामगिरीसाठी जी रचना केली होती, तशीच ही एसटीडीची रचना आहे.”
हेही वाचा- “साहेब, दादा आणि ताईसाहेब हे सगळं फेकून द्या”, गोपीचंद पडळकरांची सडकून टीका
“तुम्ही म्हणता दादासाहेब आले, ताईसाहेब आल्या, साहेब आले पण आपला कुणीही साहेब नाही. आपला साहेब एकच आहे, ते म्हणजे डॉ. बाबासाहेब… त्यांच्यापलीकडे आपला दुसरा, तिसरा किंवा चौथा असा कोणताही साहेब नाही. बाबासाहेबांमुळे आपण माणसांत आहोत. आपल्या घरात बाबासाहेंबाचा फोटो असलाच पाहिजे. मी हक्काने सांगतो, कारण माझ्या घरात बाबासाहेबांचा फोटो आहे. मी रोज त्यांचं दर्शन घेतल्याशिवाय घराबाहेर पडत नाही. कारण आपल्याला इतकी ताकद बाबासाहेबांनीच दिली,” असं गोपीचंद पडळकरांनी नमूद केलं.
हेही वाचा- “अजित पवार लबाड लांडग्याचं…”; ‘त्या’ नोटीसवर पडळकरांची प्रतिक्रिया, म्हणाले, “मी माफी…”
“त्यामुळे साहेब वगैरे म्हणणं सोडून द्या. दबावात राहणं बंद करा. त्यांना काय वाटेल? कोण काय म्हणेल? जवळच्यांना काय वाटेल? अरे हे जवळचे तर सोडून द्या. ते तर तिथे बूट चाटत बसलेत. त्यांच नाद सोडून द्या. तुम्हाला जर राजकर्ती जमात व्हायची असेल, तुम्हाला जर सरकारमध्ये धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करायची असेल, तर धनगरांच्या पुढे एकच पर्याय आहे. तुम्ही संघटीत होणं, तुम्ही एकजूट होणं आणि निर्भिडपणे या प्रस्थापितांच्या विरोधात लढणं. यापलीकडे दुसरा कोणताही पर्याय आपल्याकडे नाही,” असंही गोपीचंद पडळकर म्हणाले.