गेल्या काही दिवसांपासून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर हे सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करत आहेत.अलीकडेच पडळकरांना अजित पवारांचा उल्लेख ‘लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू’ असा केला होता. तर सुप्रिया सुळेंनाही ‘लबाड लांडग्याची लेक’ म्हटलं होतं. यानंतर आता पुन्हा एकदा गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली आहे. शरद पवारांना एवढा माज आणि मस्ती कुठून आली? असा सवाल पडळकरांनी केला. ते कोल्हापुरात बोलत होते.

धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर भाषण करताना गोपीचंद पडळकर म्हणाले, “राज्यात आमची लोकसंख्या दोन कोटी असताना आम्हाला केवळ साडेतीन टक्के आरक्षण दिलं. मग आमच्या वाट्याला काय मिळालं? म्हणून तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे, या लबाड लांडग्यापासून सावध राहा. हा लबाड लांडगा आपल्या जातीमध्ये विष पेरण्याचं काम करतोय. जाती-जातींमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करतोय. समाज-समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही सगळे एकत्रित आला तर या राज्य सरकारला धनगरांच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावीच लागेल. न्यायालयात जे काय व्हायचंय, ते होऊ द्या.”

Ajit Pawar on Yogi Adityanath
योगी आदित्यनाथांमुळे अजित पवारांची गोची; मोदी-शाहांची एकही सभा नाही; अस्तित्वाची लढाई राष्ट्रवादी कशी लढणार?
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
snake viral video | snake bit video
बापरे! सापाने दंश करताच तरुणाने केलं असं काही की, VIDEO पाहून तुम्हालाही भरेल धडकी
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
aishwarya narkar slams netizen who writes bad comments
“आई आणि बायकोवरून…”, आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्याला ऐश्वर्या नारकरांनी सुनावलं; म्हणाल्या, “महिलांचा…”
a daughter angry on his father for Spreading things in the house
“नुसता पसारा करतात…” चिमुकलीने काढली वडीलांची खरडपट्टी, Video होतोय व्हायरल
Challenge of Sharad Pawar group before Tanaji Sawant print
लक्षवेधी लढत: परांडा : तानाजी सावंतांसमोर शरद पवार गटाचे आव्हान
Raj Thackeray Slams Uddhav Thackeray in his Speech
Raj Thackeray : राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका, “बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते माझ्या शिवसेनेची काँग्रेस होताना दिसली तर..”

हेही वाचा- “…ते तर तिथे बूट चाटत बसलेत”, साहेब, ताई, दादा म्हणत पडळकरांचा पुन्हा हल्लाबोल

शरद पवारांवर टीकास्र सोडताना पडळकर पुढे म्हणाले, “जेव्हा आपण चौंडीमध्ये जयंती साजरी करायचो, तेव्हा तिथे कधीही राजकारण होत नव्हतं. पण गेल्यावर्षी ८३ वर्षांचे शरद पवार चौंडीत आले होते. त्यापूर्वी ८३ वर्षांत हा बहाद्दर एकदाही चौंडीत आला नाही. आहिल्यादेवीच्या गावात जयंतीला अभिवादन करायला आले. पण वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांना वाटलं की, चौंडीला गेलं पाहिजे. आहिल्यादेवींची जयंती साजरी केली पाहिजे. ८२ व्या वर्षी त्यांना चौंडीत जावं वाटलं, तेही नातवाला लाँच करण्यासाठी. त्यावेळी ते भाषणात काय म्हणाले की, माझा नातू ज्या मतदारसंघाचा आमदार आहे. तिथे आहिल्यादेवींचा जन्म झाला आहे. अरे एवढा माज आला कुठून? एवढी मस्ती आली कुठून? तुम्ही आहिल्यादेवींपेक्षा तुमच्या नातवाला मोठं समजता का?”