भारतीय जनता पार्टीचे आमदार तथा सातारा जिल्हा भाजपाचे अध्यक्ष जयकुमार गोरे यांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात त्यांची कार बैणगंगा नदीच्या पुलावरून ५० फूट खोल खड्ड्यात कोसळली. या अपघातानंतर जयकुमार गोरे यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान, या अपघाताबाबत जयकुमार गोरे यांचे वडील भगवान गोरे यांनी खळबळजनक विधान केले आहे. त्यांनी या अपघातामागे घातपात असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.

“मी आमदारांशी बोललो आहे. त्यांची प्रकृती ठीक आहे. मात्र एक शंका मनात उत्पन्न होत आहे. रस्त्यावर कुठलीच वाहतूक नसताना गाडीला अपघात कसा घडतो, असा प्रश्न मला पडला आहे. आमच्या गावात म्हणजे फलटणमध्येच हा अपघात घडला आहे; यामुळे जास्तच शंका येत आहे,” असे जयकुमार गोरे यांचे वडील भगवान गोरे म्हणाले आहेत.

Sanju Samson father Viswanath video viral
Sanju Samson : ‘३-४ लोकांमुळे माझ्या मुलाची १० वर्षें वाया गेली…’, संजू सॅमसनच्या वडिलांचे धोनी-विराटसह रोहित शर्मावर गंभीर आरोप, VIDEO व्हायरल
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
youth stabbed in head, Thane, Thane crime news,
ठाणे : वाद सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या डोक्यात चाकूने भोसकले
Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Ajit Pawar scolded Ravi Rana
“महायुतीत मिठाचा खडा टाकू नका”, मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री अजित पवारांनी रवी राणांना खडसावले
Pankaja Munde At Rally In Parali Beed.
“डोळ्यांसमोर कमळ येईल, पण तुम्ही घड्याळाचेच बटन दाबा…” धनंजय मुंडेंच्या समोरच काय म्हणाल्या पंकजा? पाहा व्हिडिओ
bund garden road, attack on youth, Pune,
पुणे : बंडगार्डन रस्त्यावर तरुणाचा खुनाचा प्रयत्न, दोघांविरुद्ध गुन्हा
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
Nitin Gadkari Umarkhed, Nitin Gadkari Kisan Wankhade,
“काँग्रेसने जातीयवाद आणि सांप्रदायिकतेच विष कालवले,” नितीन गडकरी यांची यवतमाळात टीका

पुणे-पंढरपूर रस्त्यावर झाला अपघात

जयकुमार गोरे यांच्या गाडीला पुणे-पंढरपूर रस्त्यावर फलटणजवळील मलठण स्मशानभूमी लगत अपघात झाला. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. यात गाडी बैणगंगा नदीच्या पुलावरून ५० फूट खोल खड्ड्यात गेली. या अपघातात गोरेंबरोबरच गाडीमधील इतर दोघे किरकोळ जखमी आहेत. गंभीर जखमी असणाऱ्या दोघांना उपचारासाठी बारामतीला हलवण्यात आले आहे. आमदार जयकुमार गोरे आणि त्यांच्या सुरक्षारक्षकावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज पहाटे ते मुंबईवरून त्यांच्या निवासस्थानी जात असताना हा अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की, गोरे यांची गाडी पुलाचा कठडा तोडून थेट खाली ५० फूट खोल नदीत कोसळली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आमदार गोरे हे शुद्धीत असून ते किरकोळ जखमी झाले आहेत.