शिवसेना नाव आणि पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण गोठवलल्यानंतर भाजपा आमदार कृष्णा खोपडे यांनी उद्धव ठाकरेंवर खोचक टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्त्वाचा झेंडा सोडून हिरवा झेंडा हातात घेतला आहे. त्यामुळे त्यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा, असे ते म्हणाले.

हेही वाचा – ही फार मोठी त्सुनामी आहे ; उद्धव ठाकरेंची ‘हम दो हमारे दो’ अशी परिस्थिती होणार – चंद्रशेखर बावनकुळे

“एकनाथ शिंदेंची शिवसेना खरी”

“काल निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला, त्यानंतर उद्धव ठाकरे आणि आता त्यांच्या उरलेल्या समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा. कारण निवडणूक आयोग बहुमताच्या जोरावर निर्णय घेत असते आणि बहूमत हे एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. एकनाथ शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे”, अशी प्रतिक्रिया आमदार कृष्णा खोपडे यांनी दिली आहे.

हेही वाचा – निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात; म्हणाले, “धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याला…”

“उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्याबरोबर जाऊन हिरवा झेंडा हातात घेतला आहे, तर शिंदे हिंदुत्त्वाची भूमिका घेऊन पुढे जात आहेत. जेव्हा अंतिम निर्णय येईल तेव्हा खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेची शिवसेना ठरेल आणि त्यांना धनुष्यबाण हे चिन्ह मिळेल”, असेही ते म्हणाले.