भाजपा आमदार नितशे राणे यांनी पुन्हा एकदा महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. दोन डोस घेतलेल्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी दिली जावी, या मागणीसाठी काल भाजपाकडून मुंबईतील विविध रेल्वेस्थानकांवर आंदोलन करण्यात आलं. त्यावर, दोन दिवसांत लोकल संदर्भात निर्णय होईल असं राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली होती. यावरून आमदार नितेश राणे यांनी महाविकासआघाडी सरकारवर निशाण साधत “सरकार नाक दाबल्याशिवाय काहीच करत नाही का?” असा सवाल केला आहे.

सर्वासाठी लोकलबाबत दोन दिवसांत निर्णय

“दोन दिवसात लोकल चालू ..१७ ऑगस्ट पासून शाळा चालू ..मग दोन डोस घेतलेल्यांना मंदिर दर्शन का नाही ? हे सरकार नाक दाबल्या शिवाय काहीच करत नाही का ? हिंदूवर अन्याय करणे हा महाविकास आघाडीचा “किमान समान कार्यक्रम” झाला आहे !” अशा शब्दांमध्ये भाजपा नेते नितेश राणे यांनी ट्विटकरत महाविकासआघाडी सरकावर टीका केली आहे.

मुंबईत राहणारा ‘हिंदू खतरे में है’; नितेश राणेंचं ट्वीट, ठाकरे सरकारवर निशाणा

तसेच, करोनाचा शिरकाव झाल्यापासून सरकारकडून सण उत्सवांसाठी नियमावली ठरवून दिली जात असून, याच मुद्यावरून भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. “हिंदू समाज… हिंदू सण… हिंदू संस्कृतीवर नियोजित पद्धतीने हल्ले केले जात आहेत आणि तेही महाराष्ट्र सरकारच्या मदतीने… असंख्या घटना कानावर येत आहेत. पश्चिम बंगालसारखा मुंबईत राहणारा “हिंदू खतरे में है” असं सांगण्याची वेळ आली आहे”,  असं नितेश राणे म्हणालेले आहेत.

“मराठीचे खरे मारेकरी ही पेंग्विनची सेना; नव्या शिवसेनेचा आणि मराठीचा संबंध काय?”

या अगोदर देखील नितेश राणे ठाकरे सरकार व शिवसेनेवर सातत्याने टीका करत आलेले आहेत. नव्या शिवसेनेचा आणि मराठीचा संबंध काय? आधी मराठी माणूस मुंबईमधून हद्दपार केला. मराठीचे खरे मारेकरी ही पेंग्विनची सेना, बाळासाहेब यांची सेना आहे कूठे? मराठी माणसाची संघटना म्हणे..मग..बेस्टच्या जागा – कनाकीय, बीएमसी कॉन्ट्रॅक्ट – दिनो, रात्रीच्या पार्ट्या – पटानी ..कपुर .. जॅकलीन, इथे कुठे शाखा प्रमुख दिसत नाहीत ? मराठी माणूस दिसत नाही ? असं नितेश राणे म्हणालेले आहेत.

Story img Loader