शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या भाजपा आमदार नितेश राणे व त्यांचे स्विय सहाय्यक राकेश परब यांना सिंधुदुर्ग जिल्हा न्यायाधीश एस व्ही हांडे यांनी प्रत्येकी ३० हजार रुपयांचा सशर्त जामीन मंजूर केला आहे. दरम्यान दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत नितेश राणे आणि राकेश परब या दोघांनाही कणकवली तालुक्यात येण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. सरकार पक्षातर्फे अॅड प्रदीप घरत, तर आमदार नितेश राणे, राकेश परब यांच्यासाठी अॅड. सतीश मानेशिंदे, अॅड. संग्राम देसाई, अॅड. राजेंद्र रावराणे आदींनी युक्तिवाद केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आमदार नितेश राणे यांना कणकवली न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांची तब्येत बरी नसल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर छातीत दुखत असल्याने त्यांना कोल्हापूर येथील प्रमिलाराजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अधिक उपचारासाठी नेण्यात आले. ते या ठिकाणी उपचार घेत आहेत. दरम्यान आज (९ फेब्रुवारी) त्यांच्या नियमित जामीन अर्जावर सिंधुदुर्ग जिल्हा न्यायाधीश एस व्ही हांडे यांनी निर्णय दिला.

३० हजार रुपयांचा सशर्त जामीन

याबाबत माहिती देताना आमदार नितेश राणे याचे वकील अॅड संग्राम देसाई म्हणाले, “नितेश राणे आणि त्यांचे स्विय सहाय्यक राकेश परब यांना ३० हजार रुपयांचा सशर्त जामीन मंजूर झाला आहे. या प्रकरणी दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत त्या दोघांना कणकवली तालुक्यात प्रतिबंध घालण्यात आला आहे. तसेच दर सोमवारी सकाळी १० ते १२ वाजता त्यांना पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागेल. याशिवाय पोलीस तपासात सहकार्य करतानाच पोलीस तपासासाठी बोलावतील तेव्हा उपस्थित राहावे अशी अट जामीन मंजूर करताना न्यायालयाने घातली आहे.”

“दोन संशयित फरार आरोपींचा राणेंशी संबंध नाही”, राणेंच्या वकिलाचा दावा

“पोलिसांनी जलदगतीने तपास करत आहोत, असे म्हटले आहे. त्यामुळे लवकरच दोषारोपपत्र दाखल होईल अशी अपेक्षा आहे. तसेच संदेश उर्फ गोट्या सावंत यांना सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पाळून हजर राहावे लागेल. मात्र, अन्य दोन संशयित फरार आरोपींचा राणे यांच्याशी काही संबंध नाही,” असंही संग्राम देसाई यांनी सांगितलं.

हेही वाचा : “मी मंत्री असताना नितेश राणेंची तपासणी करुन पुन्हा जेलमध्ये पाठवलं होतं, आता…”, दीपक केसरकरांचा घरचा आहेर

राणे यांचे बंधू माजी खासदार निलेश राणे न्यायालयात हजर होते ते म्हणाले, जामीन मंजूर झाला आहे आता आणखी काही बोलणार नाही.” सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख कणकवली करंजे येथील शिवसैनिक संतोष परब यांच्यावर १८ डिसेंबर रोजी हल्ला झाला होता. या हल्ल्याचा कट रचला असल्याचा आरोप आमदार नितेश राणे यांच्यावर करण्यात आला होता.

आमदार नितेश राणे यांना जामीन मिळाल्यावर सिंधुदुर्गात भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष

आमदार नितेश राणे यांना जामीन मिळाल्यावर सिंधुदुर्गात भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला. कुडाळमध्ये घोषणाबाजी करत फटाक्यांची आतीषबाजी करण्यात आली. कुडाळ, कणकवली, वैभववाडी, देवगडमध्येही फटाके वाजवून आनंद व्यक्त करण्यात आला. नितेश राणेंना जामीन मिळाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Live Updates
15:46 (IST) 9 Feb 2022
आरोपपत्र दाखल होईपर्यंत नितेश राणेंना कणकवलीत येण्यास मनाई

आरोपपत्र दाखल होईपर्यंत कणकवलीत येण्यास नितेश राणेंना मनाई, साक्षीदारांवर दबाव आणता येणार नाही, याशिवाय आठवड्यातून एकदा पोलीस स्टेशनला हजेरी लावावी लागणार

15:34 (IST) 9 Feb 2022
ही खोटी केस, आरोपपत्रही दाखल व्हायला नको : सतीश मानेशिंदे

नितेश राणे यांचे वकील सतीश मानेशिंदे यांच्याकडून कोर्टाचे आभार, ही खोटी केस असल्याचा आरोप, अशा प्रकरणात आरोपपत्र देखील दाखल व्हायला नको, असं मत मानेशिंदे यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना व्यक्त केलं.

15:32 (IST) 9 Feb 2022
साक्षीदारांवर दबाव न आणणं आणि हजेरी या अटीवर जामीन

नितेश राणे यांना कोर्टाचा सशर्त जामीन मंजूर, साक्षीदारांवर दबाव न आणणं आणि हजेरी या अटी