शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेला हल्ला प्रकरणी आज भाजपाचे आमदार नितेश राणे कणकवली न्यायालयामध्ये शरण आले होते त्यानंतर युक्तिवाद झाला. न्यायालयाने त्यांना येत्या ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर, सरकार पक्षातर्फे दहा दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली गेली होती. दरम्यान कोर्टान पोलीस कोठडी सुनावल्यानंतर पोलिसांकडून त्यांची चौकशी सुरु झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सकाळी १० वाजता नितेश राणे यांना चौकशीसाठी कणकवली पोलीस ठाण्यात आणण्यात आलं आहे. बुधवारी कोर्टाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिल्यानंतर त्यांना रात्री सावंतवाडी पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलं होतं. सावंतवाडी पोलीस ठाण्यातून सकाळी कणकवली पोलीस ठाण्यात राणे यांना नेण्यात आलं. कणकवली पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर हे या प्रकरणी तपास करत आहेत.

शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरण : भाजपा आमदार नितेश राणेंना ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

आमदार नितेश राणे बुधवारी कणकवली दिवाणी न्यायालयात शरण झाले. कणकवली दिवाणी न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली अशी माहिती आमदार नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी दिली.

नितेश राणे दुपारी तीन वाजता कणकवली प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सलीम शेख यांच्या न्यायालयात हजर होण्यासाठी रवाना झाले होते. त्यानंतर ते न्यायालयात शरण आल्यावर न्यायालयीन कोठडीचा आदेश झाला. यानंतर फिर्यादी पक्ष आणि राणे यांच्या वकिलांना युक्तिवाद करण्याची संधी देण्यात आली.

VIDEO: “अरे नको ना निलेश…”, मोठा भाऊ पोलिसांशी हुज्जत घालत असताना नितेश राणे करत होते विनवणी

काय आहे प्रकरण –

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये तत्कालीन बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचा प्रचार प्रमुख कणकवली करंजे येथील शिवसैनिक संतोष परब याच्यावर कणकवली करंजे येथील घरी जाताना दि.१८ डिसेंबर रोजी त्यांच्या दुचाकीला मागवून इनोवा गाडीने धडक दिली होती. गाडीला धडक दिल्यानंतर दुचाकी त्यांच्या पायावर पडली आणि गाडीतील संशयितांनी येऊन त्यांच्या छातीवर धारदार वस्तूने हल्ला केला अशी त्याने तक्रार दिली होती त्यानंतर चौघांना फोंडाघाट तपासणी नाक्यावर ताब्यात घेण्यात आले होते तर सचिन सातपुते याला दिल्लीवरून अटक झाली होती आमदार नितेश राणे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, आमदार राणे यांचे खाजगी सचिव राकेश परब यांच्या नावाचा उल्लेख तपासात आल्यानंतर त्यांना पोलिसांनी नोटीस दिली होती.

या नोटीसीनंतर आमदार नितेश राणे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संदेश सावंत, राकेश परब आदिनी जिल्हा न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन साठी अर्ज केला होता. या अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्याच्यावर अटकपूर्व जामीन साठी अर्ज केला. मुंबई उच्च न्यायालयाने जामीनअर्ज फेटाळल्यानंतर आमदार राणे हे सर्वोच्च न्यायालयात गेले होते सर्वोच्च न्यायालयाने त्यांना न्यायालयात शरण येण्यास सांगितले होते तोपर्यंत दहा दिवस त्यांना अटकेपासून सवलत देणारे आदेश न्यायालयाने दिले होते.

या रम्यान दोन दिवसापूर्वी जिल्हा न्यायालयामध्ये नियमित जमीन मिळावा म्हणून आमदार राणे यांनी अर्ज दाखल केला. जिल्हा न्यायालयाने नियमित जामीन अर्ज काल मंगळवारी फेटाळला. त्यांनी पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र ती मागे घेत्याचे अँड सतिश माने शिंदे यांनी सांगितले. त्यानंतर राणे कणकवली न्यायालयामध्ये शरण आले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mla nitesh rane kankavli police station shivsena santosh parab attack case sgy