हिंदू मुलींचं धर्मांतर करण्यासाठी तरुणांना आर्थिक बळ दिलं जात असून, यासाठी ‘रेट कार्ड’ तयार करण्यात आलं असल्याचा गंभीर आरोप भाजपा आमदार नितेश राणे यांनी केला आहे. अहमदनरमध्ये अल्पवयीन मुलीला धर्मांतर करण्यास भाग पाडत, अत्याचार करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून धर्मपरिवर्तनाचा मुद्दा उपस्थित केला. यावर उत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती दिली.

नितेश राणे काय म्हणाले –

“महाराष्ट्रासाठी हा फार गंभीर प्रश्न आहे. अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये धर्मपरिवर्तनाच्या नावाने एका अल्पवयीन मुलीला फसवलं जातं. मुलीवर अत्याचार करत चुकीच्या पद्धतीने वापर केला जातो. गुन्हा दाखल झाल्यानंतर लगेच आरोपीला पकडलं जात नाही. संबंधित पोलीस अधिकाऱ्याने आरोपीला स्थानिक जेलमध्ये बंद केलं आहे. सेंट्रल जेलमध्ये पाठवलेलं नाही,” असं नितेश राणे म्हणाले.

man raped minor girl under railway bridge in nagpur
धक्कादायक! रेल्वे पुलाखाली अल्पवयीन मुलीवर करायचा लैंगिक अत्याचार…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
I have Been Framed Said Sanjay Roy
Kolkata Rape and Murder : “मला अडकवलं जातं आहे, कारण..” ; आर.जी. कर बलात्कार आणि हत्या प्रकरणातला आरोपी संजय रॉय काय म्हणाला?
woman frouded elder woman by forced to deposit money in verious accounts
लंडनमधील मैत्रिणीकडून वयोवृद्धाची लाखोंची फसवणूक
arvind sawant
“तेव्हा मी त्यांची लाडकी बहीण होती, पण आता…”; ‘त्या’ विधानावरून शायना एनसींचं अरविंद सावतांवर टीकास्र!
fraud with the lure, virtual currency, Hadapsar police,
पुणे : आभासी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने दोन कोटींची फसवणूक, हडपसर पोलिसांकडून सहाजणांविरुद्ध गुन्हा
two unidentified men robbed gold chain from woman
बोलण्यात गुंतवून वृद्ध महिलेची सोनसाखळी पळवली
Anganwadi workers murder case in Ahilyanagar Notice of action to Anganwadi workers
‘सुरक्षेची भाऊबीज ओवाळणी’ ऐवजी अंगणवाडी सेविकांना कारवाईची नोटीस

Maharashtra News Live : विधिमंडळ कामकाजाला घोषणाबाजीने सुरुवात; राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर!

“सानप नावाच्या अधिकाऱ्याचे आरोपीसोबत आर्थिक व्यवहार असल्याची चर्चा आहे. आरोपीला घरचं जेवण दिलं जात असून, इतर मदतही केली जात आहे. हा महाराष्ट्रासाठी गंभीर विषय आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धर्मपरिवर्तनाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींना फसवलं जातं आणि त्यासाठी त्यांना ताकद दिली जाते,” असा आरोप नितेश राणेंनी केला.

‘एक महिन्यानंतर शरद पवारांना कंठ फुटला” अतुल भातखळकरांची खोचक टीका, म्हणाले…

पुढे ते म्हणाले “हिंदू मुलींचं धर्मपरिवर्तन करण्यासाठी पैसे दिले जातात, बाईक दिली जाते. धर्मपरिवर्तनाला बळ देण्यासाठी आर्थिक मदत केली जात आहे. रेट कार्ड करण्यात आलं आहे. शीख तरुणीला फसवलं तर सात लाख, पंजाबी हिंदू तरुणीला फसवलं तर सहा लाख, गुजराती ब्राह्मण तरुणीसाठी सहा लाख, ब्राह्मण तरुणीसाठी पाच लाख, क्षत्रिय तरुणीसाठी चार लाख असं रेट कार्ड आहे. तरुणींना विकण्यापर्यंत यांची मजल जात आहे. धर्म परिवर्तनाच्या नावाखाली मुलींचं आयुष्य बर्बाद केलं जात आहे”.

आरोपींसोबत संबंध असणाऱ्या अधिकाऱ्याला बडतर्फ केलं जावं अशी मागणी यावेळी नितेश राणे यांनी केली. महाराष्ट्रात या घटना वाढत असून उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरातप्रमाणे धर्मांतरविरोधी कायदा लागू कऱणार का? अशी विचारणाही नितेश राणे यांनी यावेळी केली.

फडणवीसांचं उत्तर –

नितेश राणेंच्या प्रश्नावर बोलताना फडणवीसांनी उत्तर दिलं की, “नितेश राणेंनी मांडलेला विषय फार गंभीर आहे. पीडिता अल्पवयीन असताना तीन वर्ष आरोपी इमरान युसूफ कुरेशी याने अत्याचार केले. यासंदर्भात वारंवार तक्रार करुनही पोलीस अधिकारी सानप यांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. लगेच बडतर्फ करता येणार नाही, त्यासाठी प्रक्रिया असते. पण यांना केलेला गुन्हा आणि वागणूक यासाठी कडक शिक्षा केली जाईल. त्यांचे आरोपींसोबत संबंध असल्याचं निष्पन्न झालं तर त्यांच्यावरही गुन्हेगारी स्वरुपाचा कट रचल्यासंदर्भात कारवाई केली जाईल”.

“आरोपीवर मोठ्या प्रमाणात गुन्हे असून, याची माहिती घेऊन विशेष कायद्यांतर्गतही कारवाई करता येईल का हे तपासलं जाईल. धर्मांतरणाचा कायदा आपल्याकडे आधीच अस्तित्वात आहे, कायद्यामध्ये तरतुदी आहेत. आमिष देऊन, जबरदस्तीने कोणीही धर्मांतरण करु शकत नाही. जर कायद्यामधील तरतुदींमध्ये त्रुटी असल्या, तर त्या अधिक कठोर करण्यासाठी प्रयत्न केला जाईल,” असंही त्यांनी सांगितलं. .