गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी अनेकदा उपोषण केलं आहे. काही दिवसांपूर्वी सुरु केलेलं उपोषण मनोज जरांगे पाटील यांनी आज स्थगित केलं. यानंतर मनोज जरांगे यांनी भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. तसेच मला जेलमध्ये टाकण्याचा भाजपाचा डाव असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. तसं झाल्यास मराठ्यांविरोधात असलेल्या उमेदवारांना निवडणुकीत पाडणार असल्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिला.

मनोज जरांगे पाटील यांच्या या टीकेला आता भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी खुलं आव्हान दिलं आहे. “तुम्हाला आमचे उमेदवार पाडायचे आहेत तर तुम्ही २८८ उमेदवार उभे करा. मग आम्ही सुद्धा पाहून घेतो तुम्ही उमेदवार कसे पाडता”, असा इशारा प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांना दिला.

Sadanand literary conference
सांगली: जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होईल; लवटे
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Manoj Jarange On Dhananjay Munde
Manoj Jarange : ‘धनंजय मुंडे सरकारवरील डाग, त्यांच्या गुंडाची टोळी थांबवा, अन्यथा आम्ही…’, मनोज जरांगेंचा मोठा इशारा
Manoj Jarange
Manoj Jarange : मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल, “खंडणीतला आरोपी तुमचं सरकार….”
Guardian Minister Controversy
Manikrao Kokate : पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार? अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आता निर्णय…”
Devendra Fadnavis talk about his political career in BJP and about RSS
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कबुली, म्हणाले, “संघ स्वंयसेवकाला आदेश पाळायचा असतो, तेच मी केले म्हणून भाजपमध्ये…”
Devendra Fadnavis Speech
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने हास्यकल्लोळ, “सकाळचा शपथविधी नको म्हणून यावेळी आम्ही संध्याकाळी…”
What Suresh Dhas Said About Munni?
Suresh Dhas : सुरेश धस यांचं वक्तव्य; “मुन्नी म्हणजे राष्ट्रवादीतला एक पुरुष, त्या मुन्नीने कुठेही चर्चेला यावं, मी…”

हेही वाचा : महायुतीत धुसफूस! “मंत्र्यांनी अजूनही सुधरावं…”, अजित पवार गटाच्या आमदाराचा इशारा

प्रसाद लाड काय म्हणाले?

“मनोज जरांगे पाटील यांनी खालच्या पातळीवर जाऊन प्रवीण दरेकरांवर टीका केली. मी वेळोवेळी त्यांना सांगत होतो की आपण मराठे आहोत याचं भान ठेवलं पाहिजे. पण मला माहिती नाही की उपोषणामुळे मनोज जरांगे यांचं मानसिक संतुलन बिघडलं की काय? कारण ते सातत्याने शिवराळ भाषेत टीका करतात. कधी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करायची. कधी भारतीय जनता पार्टीवर टीका करायची. सर्वांना मी निवडणुकीत पाडून टाकतो, पाहून घेतो, अशी धमकी द्यायची. मात्र, मनोज जरांगे पाटील यांना एक गोष्ट सांगायची आहे, तुम्हाला जर आमचे उमेदवार पाडायचे असतील तर तुम्ही २८८ उमेदवारच निवडणुकीत उभे करुन दाखवा. मग आम्हीही पाहून घेतो की तुम्ही आमचे उमेदवार कसे पाडता”, असं आव्हान प्रसाद लाड यांनी दिलं.

प्रसाद लाड पुढे म्हणाले, “अशा प्रकारची भाषा बोलणं योग्य नाही. कारण तुमचा विषय हा आरक्षणाचा आहे. आरक्षणाच्या तुमच्या संघर्षाला आमचा पाठिंबा आहे. तुम्ही ज्या प्रकारे छगन भुजबळ आणि प्रवीण दरेकर यांची तुलना केली. पण माझं आवाहन आहे की प्रत्येकाचं रक्त हे लालच असतं. त्याला धर्म, जात, पंथ नसतो. मराठा, शीख किंवा मुस्लीम असो. त्यामुळे तुमच्या हातात निजामाने बेल पत्र दिलेलं नाही की ज्याच्या हातामध्ये ते पत्र पडेल तो मराठा. आम्ही मराठे आहोत याचं प्रमाणपत्र आम्हाला तुमच्याकडून घेण्याची गरज नाही. तशा पद्धतीची गरज आयुष्यात लागणारही नाही. तुमच्या सत्य परिस्थितीवर आम्ही बोलायला लागलो तर कदाचित तुम्हाला तोंड लपवण्याची वेळ येईल”, अशी टीका प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर केली.

Story img Loader