ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा आमदार प्रसाद लाड आणि त्यांच्या कंपनीवर केलेल्या भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. या आरोपानंतर आमदार लाड आक्रमक झाले आहेत. संजय राऊत यांनी माझं किंवा माझ्या कंपनीचे नाव घेतलं, तर स्वप्नातला संजय राऊत काय आहे? हे मी प्रसारमाध्यमांसमोर आणेन. तसेच मी उद्या सकाळपर्यंत माझ्या वकिलांशी बोलून २०० ते ५०० कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे, असंही प्रसाद लाड म्हणाले. दरम्यान, त्यांनी संजय राऊतांना थेट शिवीगाळही केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना प्रसाद लाड म्हणाले की, शिवसेना खासदार संजय राऊतांची पत्रकार परिषद ऐकली. काही पत्रकारांच्या माध्यमातून मला माहिती मिळाली की, संजय राऊत सातत्याने माझा आणि माझ्या कंपनीचा उल्लेख करत आहे. प्रसाद लाड आणि क्रिस्टल कंपनीचा १ हजार कोटींचा भ्रष्टाचार वगैरे. संजय राऊतांच्या संसदीय भाषेत बोलायचं झालं, तर संजय राऊत *** झालाय. ज्या गोष्टीचा काही संबंध नाही, ज्याला कसल्याही माहितीचा आधार नाही. कशामध्ये नाव घ्यायचं? कशात नाही घ्यायचं? हे कळत नाही. अशा माणसाला हीच संसदीय भाषा वापरली पाहिजे, अशी तिखट प्रतिक्रिया देत प्रसाद लाड यांनी राऊतांना शिवी दिली आहे.

प्रसाद लाड पुढे म्हणाले, “आपल्या माध्यमातून मी संजय राऊतांना सांगू इच्छितो की, यापुढे त्यांनी माझं किंवा माझ्या कंपनीचे नाव घेतलं, तर स्वप्नातला संजय राऊत काय आहे? हे मी प्रसारमाध्यमांसमोर आणेल. त्याचे व्हिडीओ लोकांसमोर आणेल. मी माझ्या वकिलांशी चर्चा करून उद्या सकाळपर्यंत संजय राऊतांविरोधात २०० ते ५०० कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे.”

“उधळलेल्या रेडकूला मारण्यासाठी भाल्याचा वापर केला जातो. अशा रेडकूला भाल्याने मारण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आक्रमक भूमिका घेत आहे. मेहनतीने उभं केलेल्या साम्राज्याला कुणी खोटारडेपणाने डाग लागत असेल तर छत्रपतींनी दिलेली शिकवण आहे, अंगावर आलं तर शिंगावर घ्यायचं,” असंही आमदार लाड म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mla prasad lad used abusive language to mp sanjay raut in nagpur over corruption allegations rmm