जितेंद्र आव्हाड यांनी राम मांसाहारी होता असं वक्तव्य बुधवारी शिर्डी येथील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात केलं. त्याचे पडसाद दिवसभर उमटले, विविध पद्धतीने जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करण्यात आला. ज्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी आपण ओघात बोलून गेलो पण माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत असं म्हणत वाल्मिकी रामायणातले श्लोक बघा असंही सांगितलं. रामाविषयी त्यांनी जे वक्तव्य केलं तो वाद अद्याप शमलेला नाही. आता भाजपा नेते राम कदम यांनी शरद पवार आणि त्यांचा गट हिंदू विरोधी आहेत असं म्हणत टीका केली आहे.

काय म्हणाले राम कदम?

“शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे की हा देश गाय आणि गोमूत्र या दिशेने निघाला आहे, या वक्तव्याचा अर्थ काय? शरद पवारांसाठी ती गाय असेल, मात्र हिंदू समाजासाठी ती गोमाता आहे आणि पूजनीय आहे. हा श्रद्धेतला आणि आस्थेतला हा फरक आहे. शरद पवारांनी अशा प्रकारे विधानही कधी येतं ज्यावेळी त्यांचे चेले जितेंद्र आव्हाड करोडो लोकांचं श्रद्धास्थान असलेल्या रामाविषयी वक्तव्य करतात त्यावेळी.”

हे पण वाचा- “शिशुपालाप्रमाणेच जितेंद्र आव्हाडांचे १०० अपराध भरले आहेत, आता हिंदू..”; महंत सुधीरदास यांचा हल्लाबोल

जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य शरद पवारांच्या सांगण्यावरुनच

जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यावर माफी मागितलेली नाही ते सोडून प्रभू राम मदिरापान करत होते, नृत्य पाहात होते अशीही टीका ते करतात. आमच्या देवाला आमच्या श्रद्धेला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. जितेंद्र आव्हाड यांचं हे वक्तव्य त्यानंतर येणारं शरद पवारांचं वक्तव्य हे दोन्ही जोडले तर काय अर्थ निघतो? तो एकच की शरद पवार यांचा गट आणि स्वतः हिंदू विरोधी आहेत. रामभक्तांच्या विरोधात आहेत. जर असं नसेल तर शरद पवार यांनी समोर येऊन ते स्पष्ट करावं की ते आव्हाडांच्या मताला विरोध करतात. जर शरद पवार आव्हाडांच्या वक्तव्यावरुन गप्प बसत असतील तर हे सगळं त्यांच्याच सांगण्यावरुन घडतं आहे हे स्पष्ट होतं आहे. असा आरोप आता राम कदम यांनी केला आहे.

जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य काय?

राम आपला आहे, तो बहुजनांचा आहे. राम शिकार करून मांसाहार करत होता. तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला निघाला आहात. मात्र आम्ही रामाचा आदर्श मानतो आणि मांसाहारी अन्न खातो. १४ वर्ष वनवासात राहणारा माणूस शाकाहारी अन्न कुठे शोधणार?”, असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डीतील शिबिरात उपस्थित केला. तसेच शिबिरानंतर माध्यमांनी आव्हाड यांना पुन्हा एकदा या विषयावर बोलते केले. तेव्हा ते म्हणाले, “मी कोणतेही वादग्रस्त विधान केलेले नाही. मी माझ्या विधानावर ठाम आहे. श्रीरामाला शाकाहारी बनविले जात आहे. पण वनवासात असताना ते काही मेथीची भाजी खात होते का? या देशातील ८० टक्के लोक मांसाहारी असून ते राम भक्त आहेत”, असेही आव्हाड म्हणाले होते.

Story img Loader