Guardian Minister of Thane : महायुतीमध्ये एकीकडे मुख्यमंत्रीपदाचा पेच सुटत नसून दुसरीकडे महत्त्वाच्या खात्यांवरून तिन्ही प्रमुख पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. प्रामुख्याने वित्त, गृह, ऊर्जा, जलसंपदा अशा काही महत्त्वाच्या खात्यांसाठी भाजप, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) आग्रही आहेत. मुख्यमंत्रीपदाबरोबरच महत्त्वाची खातीही आपल्याकडेच ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न असला, तरी शिंदे आणि अजित पवार यांना चांगल्या खात्यांची अपेक्षा आहे. तसंच, पालकमंत्री पदासाठीही अनेक आमदार आग्रही आहेत. याबाबत ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय केळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मंत्रिपदासाठी रस्सीखेच

दिल्लीत मुख्यमंत्रीपदावरून खलबते सुरू असताना मंत्र्यांची संख्या आणि खातेवाटप हा चर्चेत कळीचा मुद्दा ठरणार आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडला असला तरी ५७ आमदार निवडून आल्यामुळे त्यांना अधिकची व चांगली मंत्रीपदे हवी आहेत. नगरविकास खाते शिंदे यांच्याकडे कायम राहील, अशी चिन्हे आहेत. याखेरीज शिंदे गटाने ऊर्जा, जलसंपदा, उद्याोग या महत्त्वाच्या खात्यांवर दावा केला आहे. मागच्या मंत्रिमंडळात शिंदेंच्या पक्षाकडे उद्याोग, रस्ते विकास, सामाजिक न्याय ही खाती होती. अजित पवार यांच्याकडे वित्त खाते कायम राहणार का, याची उत्सुकता आहे. कारण भाजप गृह आणि वित्त या खात्यांसाठी आग्रही राहण्याची शक्यता आहे. यासह सहकार, कृषी, महिला व बालकल्याण, अन्न व नागरी पुरवठा अशी खाती मिळावीत, असा राष्ट्रवादीचा प्रयत्न असेल. गेल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या आणि चांगली खाती कायम राहावीत, असा अजित पवार यांचा आग्रह असल्याचे समजते. मात्र भाजप मित्र पक्षांना फारसे झुकते माप देण्याची शक्यता नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. याउलट जनमानसात प्रभाव पडेल अशी सारी खाती ही आपल्याकडे राहावीत, असा भाजपचा प्रयत्न असेल.

हेही वाचा >> Uday Samant : दिल्लीतून थेट सातारा, मुंबईतील महायुतीची बैठक रद्द; नाराजी नाट्याच्या चर्चेवर शिंदेंचे नेते म्हणाले, “आज सकाळपर्यंत…”

पालकमंत्री जिल्ह्यातीलच असावा

तसंच, मागच्या मंत्रिमंडळात अनेक पालकमंत्री पदे जिल्ह्याच्या बाहेरील आमदाराकडे देण्यात आली होती. ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्री पद शंभूराज देसाई यांच्याकडे होतं. ते पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. दरम्यान, यावेळी जिल्ह्यातील पालकमंत्री मिळावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. यामध्ये ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे संजय केळकर यांनी पालकमंत्री पदासाठी इच्छूक असल्याची चर्चा आहे. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

पालकमंत्री पदासाठी संजय केळकर इच्छूक

संजय केळकर म्हणाले, “जिल्ह्यातील पालकमंत्री असावा हे स्वाभाविक आहे. फक्त ठाण्यातच नव्हे तर प्रत्येक जिल्ह्यात तिथला स्थानिक पालकमंत्री असावा असं संपूर्ण महाराष्ट्राला वाटतं. कारण, तो कायम नागरिकांना उपलब्ध असतो. यामध्ये काहीही चूक नाही. त्यामुळे ही मागणी स्वाभाविक आहे.”