पुण्यात आईच्या उपचाराच्या नावाखाली एका आरोपीने आमदार माधुरी मिसाळ यांच्यासह ४ महिला आमदारांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आर्थिक मदतीच्या नावाखाली फसवणूक प्रकरणात भाजपा आमदार श्वेता महाले यांनाही फोन कॉल आला होता. यावर स्वतः श्वेता महाले यांनी स्पष्टीकरण दिलं. “मलाही आईच्या उपचाराच्या नावाखाली आर्थिक मदतीसाठी एका तरुणाचा फोन आला होता. मात्र, मी शहानिशा केल्यानंतर कोणतीही मदत केली नाही,” अशी माहिती त्यांनी दिली.

भाजपा आमदार श्वेता महाले म्हणाल्या, “गेल्या आठवड्यात पुण्यातून एका तरुणाने फोन केला होता. त्या तरुणाने तो माझ्या मतदारसंघातील असून त्याची आई आजारी असल्याचं सांगितलं. तसेच आर्थिक मदतीची मागणी केली. मी या तरुणाची मतदारसंघात शहानिशा केली. तेव्हा हा तरुण माझ्या मतदारसंघातील नसून फसवणुकीसाठी फोन केल्याचं लक्षात आलं.”

cpm polit bureau
सीताराम येचुरींच्या निधनानंतर महासचिवपदी कोणाची निवड होणार? ‘ही’ नावे आहेत चर्चेत!
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
In Badlapur case accused Akshay Shinde Thane alleged encounter
चकमकी अखेर पोलिसांवरच का शेकतात?
Shiv Sena Yuva Sena Secretary Dipesh Mhatre
शिवसेना युवासेना सचिव दिपेश म्हात्रे यांना जीवे ठार मारण्याची धमकी, फलकांवरुन जबाब देण्यासाठी शक्तिप्रदर्शन करत पोलीस ठाण्यात
National Green Tribunal
National Green Tribunal : ‘एनजीटी’च्या न्यायमूर्तींनी मुलाला ॲमिकस क्युरी म्हणून नियुक्त केल्याचा आरोप; याचिका दाखल, काय आहे प्रकरण?
Small child seriously injured in attack by dog in Pune
पुण्यात कुत्र्याच्या टोळक्यांच्या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी; चाकणमधील घटना
home minister amit shah slams rahul gandhi over reservation remark in america
राहुल यांच्या वक्तव्यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
Controversy over the initials Rama written on the body of a goat
बकऱ्याच्या अंगावर लिहिलेल्या राम आद्याक्षरावरून वाद; न्यायालयात नेमके काय घडले?

“फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यानंतर मी फोन करणाऱ्या तरुणाला कोणतीही आर्थिक मदत केली नाही. परंतु लोकप्रतिनिधी म्हटल्यावर अशाप्रकारचे फोन येत असतात. अशा वृत्तींमुळे खऱ्या गरजुंना मदत करण्याची वेळ आली तर करता येत नाही. त्यामुळे अशा लोकांवर कारवाई केली पाहिजे,” अशी मागणी श्वेता महाले यांनी केली.

नेमकं प्रकरण काय?

आईला रुग्णालयात दाखल केले असून उपचारासाठी मदतीची गरज असल्याचे सांगून एका तरुणाने आमदार माधुरी मिसाळ यांच्यासह ४ महिला आमदारांकडून पैसे उकळून त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार लक्षात आला आहे. या प्रकरणी आमदार माधुरी मिसाळ यांच्या कन्या पूजा मिसाळ यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी मुकेश राठोड व गुगल पे फोन धारकावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार माधुरी मिसाळ यांच्या मोबाईलवर मुकेश राठोड याने फोन केला. आपल्या आईला बाणेर येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असून त्यासाठी पैशांची गरज असल्याचे सांगितले. मिसाळ यांना ३ हजार ४०० रुपये पाठविण्यास सांगितले. त्यानुसार मिसाळ यांनी पैसे पाठविले. त्यांच्या प्रमाणेच विधानसभेतील त्यांचे सहकारी आमदार मेघना बोर्डीकर साकोरे, आमदार देवयानी फरांदे आणि आमदार श्वेता महाले यांच्याकडूनही अशा प्रकारे काही रक्कम घेऊन फसवणूक केली.

हेही वाचा : पुणे : बँकेत नोकरीच्या आमिषाने महिलेला साडेआठ लाख रुपयांचा गंडा

याप्रकरणी पूजा मिसाळ यांनी अगोदर सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यांनी प्राथमिक तपास केला असता आरोपीने ४ महिला आमदारांची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पुढील तपासासाठी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग केला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे तपास करीत आहेत.