Maharashtra Assembly Monsoon Session News : महाराष्ट्र विधानसभा अधिवेशनात भाजपा आमदार सुभाष देशमुख यांनी संभाजीनगरमधील महावितरण कार्यालयात अधीक्षक अभियंता महिला अधिकाऱ्याला नग्न महिलेचं चित्र असणारं पेपरवेट दाखवून अश्लील चाळे करत असल्याची तक्रार केली आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई करून निलंबन करावे, अशी मागणी सुभाष देशमुखांनी केली. विशेष म्हणजे हा प्रकार जानेवारी २०२२ पासून सुरू असल्याचंही देशमुखांनी नमूद केलं आहे.

सुभाष देशमुख म्हणाले, “संभाजीनगरला महावितरणचं कार्यलय आहे. त्या ठिकाणी अधीक्षक अभियंता प्रविण मारुतीराव दरोली आहेत. त्यांच्या कार्यालयात नग्न महिलेचं चित्र काढलेलं पेपरवेट ठेवलं आहे. त्या ठिकाणी महिला अधिकारीही आहेत.”

case registered against person who stole jewellery of dead woman in kurla bus accident case
कुर्ला बस अपघात: मृत महिलेचे दागिने चोरणाऱ्याविरोधात अखेर गुन्हा दाखल
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Anti corruption department filed case against Wangani Sarpanch Vanita Adhav for demanding bribe
लाच मागितल्याने महिला सरपंचावर गुन्हा, बदलापूर जवळच्या वांगणी ग्रामपंचायतीतील प्रकार
Woman police officer abused for not taking action on vehicle
पिंपरी : कारवाई करू नये म्हणून महिला पोलिसाला शिवीगाळ
Nagpur Prostitution , college girls Prostitution Nagpur,
नागपूर : झटपट पैशांचे आमिष! महाविद्यालयीन तरुणींकडून देहव्यापार, ‘हेवन स्पा’मध्ये सेक्स रॅकेट….
bmc to rehabilitate fisherwomen in tardeo
मासळी विक्रेत्या महिलांचे पुनर्वसन होणार ? पालिका अधिकाऱ्यांची मासळी विक्रेत्या महिलांसह बैठकीत चर्चा
Nagpur dance bar, dance bar customers ,
नागपूर : डान्सबारमध्ये आंबटशौकीन ग्राहकांसमोर अश्लील नृत्य; मुंबई-दिल्लीच्या वारांगना…
woman, dance bar, Dubai, stage show,
स्टेज शो करण्याच्या नावाखाली महिलेला डान्सबारच्या कामात ढकलले, पोलिसांच्या मदतीने महिलेची दुबईतून सुखरूप सुटका

“नग्न महिलेचं पेपरवेट दाखवून टिंगल आणि अश्लील चाळे”

“अधीक्षक दरोली कार्यकारी अभियंता असलेल्या महिला अधिकाऱ्याला वारंवार बोलावून हे पेपरवेट दाखवतो. तसेच या पेपरवेटवरून टिंगल करतो आणि अश्लील चाळे करतो,” अशी तक्रार सुभाष देशमुख यांनी केली.

“अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करा”

“या महिलेने जानेवारी-फेब्रुवारीपासून हे चाळे सुरू असताना नाईलाजाने आता तक्रार दाखल केली आहे. याची चौकशी करून त्या अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्यात यावं,” अशी मागणी सुभाष देशमुख यांनी केली.

हेही वाचा : मंत्री चांगलंच उत्तर देतील अशी हमी तुम्ही कशी देता? जयंत पाटलांच्या खोचक प्रश्नावर विधानसभा अध्यक्ष नार्वेकर म्हणाले…

यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी संबंधित तक्रारीची नोंद घ्यावी आणि कारवाई करावी, असे निर्देश दिले.

Story img Loader