Suresh Dhas On Ashti Assembly Election 2024 : राज्यात विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. आता २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे सध्या महाविकास आघाडी, महायुतीसह सर्वच पक्षांच्या नेत्यांकडून प्रचाराचा धडाका सुरु आहे. दिल्ली आणि महाराष्ट्रातील दिग्गज नेते राज्यातील विविध मतदारसंघात जाऊन प्रचारसभा घेत आहेत. या सभांच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षातील नेते आणि विरोधी पक्षातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असल्याचं पाहायला मिळत आहे. यातच सर्वच नेत्यांनी जनतेला मोठमोठी आश्वासनेही दिली आहेत. मात्र, आश्वासन देण्यात सध्या बीड जिल्हा चांगलाच चर्चेत आहे.

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि उमेदवार सुरेश धस यांनी मतदारांना दिलेल्या एका अजब आश्वासनाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. सुरेश धस हे भाजपाकडून आष्टी विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत. या पार्श्वभूमीवर ते दररोज गावोगावी जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत प्रचार करत आहेत. मात्र, त्यांनी एका सभेत बोलताना शेतकऱ्यांना एक आश्वासन दिलं आणि त्याचीच चर्चा संध्या रंगली आहे. “मला मतदान करा, एक डुक्कर सुद्धा जिवंत ठेवणार नाही”, असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानाचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : “राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य मुन्नीला बोलायला लावा?”, सुरेश धस यांचं विधान, रोख कुणाकडे? परळी पॅटर्नचा उल्लेख करत म्हणाले…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal : “केजरीवाल आणि पंतप्रधान मोदी यांच्यात फरक नाही, दोघेही…”; राहुल गांधींच्या टीकेला आप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर
Who is BJP Chief Minister candidate for Delhi Assembly Elections 2025
केजरीवालांनी जाहीर केला भाजपाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा; अमित शाह संतापून म्हणाले, “तुम्ही भाजपाचे…”
Image Of MVA Leaders
MVA : “महाविकास आघाडी उद्ध्वस्त होतेय, जनतेने त्यांना हाकलून दिले”, ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा; अजित पवार गटाचा टोला
Vijay Wadettiwar On Thackeray group
Vijay Wadettiwar : “आम्ही उद्धव ठाकरेंना विनंती करू, अन्यथा…”, ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान
Hasan Mushrif
Hasan Mushrif : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत हसन मुश्रीफ यांचं विधान चर्चेत; म्हणाले, “आता पुढील निवडणुकीच्या…”
Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis
Vijay Wadettiwar : ‘देवेंद्र फडणवीसांनी आता नरेंद्र मोदींचं वारसदार व्हावं’, विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान

हेही वाचा : Eknath Shinde : महायुतीत बिनसलं? शिंदे, पवारांचा रवी राणांवर संताप; मुख्यमंत्री म्हणाले, “युतीत मिठाचा खडा…”

सुरेश धस काय म्हणाले?

“सध्या मोठ्या प्रमाणात डुकरांची संख्या वाढली आहे. या डुकरांमुळे शेतीचं मोठं नुकसान होत आहे. शेती करणं सोडून द्यावं की काय? अशा मानसिकतेमध्ये काय शेतकरी आहेत. आम्ही आता डुक्कर पकडण्याचा एक पिंजरा काढला आहे. याआधी पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मी एक कार्यक्रम घेतला होता. तेव्हा डुक्कर मारण्यासाठी एक नवाब नावाचा शूटर आणला होता. ही फार मोठी अडचण आहे. याबाबत आम्ही एक मोठं आंदोलन देखील काढलं होतं. नवाब नावाचा शूटर आणला होता त्याने एक डुक्कर मारलं. मात्र, तेव्हा तेथील मोरं फार किर्कश आरडले. तेव्हा मी म्हटलं की हे बंद करा. मात्र, यानंतर आमच्याकडच्या दोन इंजीनियरने ऑस्ट्रेलियामध्ये ज्या प्रकारे पिंजरा असतो ते पाहून आपल्याकडे बनवला आहे. त्यामध्ये एकावेळेला ५० डुक्कर अडकू शकतात. या माध्यमातून आपल्याला डुकरांची संख्या कमी करता येईल. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की, तुम्ही मला मतदान द्या. एका वर्षांत सर्व डुक्करांचा बंदोबस्त करतो. एक डुक्कर देखील जिवंत ठेवत नाही”, असं सुरेश धस यांनी एका सभेत बोलताना म्हटलं आहे.

Story img Loader