लोकसभा निवडणुकांपूर्वी भारतीय जनता पक्षाकडून आणि खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडूनही एनडीएसाठी निवडणुकीनंतर ४०० पार जागांची घोषणा केली होती. प्रत्यक्षात भाजपाला २४० तर एनडीएला २९३ जागा मिळाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपाने दिलेल्या ४०० पार घोषणेची सध्या चर्चा असतानाच भाजपा आमदारांनी केलेल्या एका विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. भिवंडीत आयोजित करण्यात आलेल्या धर्मसभेला हे भाजपा आमदार उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावरून बोलताना त्यांनी एनडीएला ४०० पार जागा मिळाल्या असत्या, तर भारत हिंदू राष्ट्र घोषित झालं असतं, असं विधान केलं आहे.

अमोल मिटकरींनी सुनावलं!

भिवंडीतील पडघ्यामध्ये संत संमेलन आणि हिंदू धर्मसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेसाठी भाजपाचे हैदराबादमधील आमदार टी. राजा सिंह हेही उपस्थित होते. यावेळी त्यांनी भाषणादरम्यान केलेले दावे आणि घोषणांवर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. खुद्द भाजपाचा महायुतीतील मित्रपक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार अमोल मिटकरी यांनीही टी. राजा यांना या विधानांवरून सुनावलं आहे. “टी. राजाला देशात लोकशाही नांदते व या देशाला संविधान आहे हे कदाचित माहिती नसावं! हा अखंड भारत आहे व तो अखंड राहील! ‘ग्लानिर्भवती भारत’ हा कृष्णाचा उपदेशही टी. राजा विसरला असावा”, अशी पोस्ट मिटकरींनी एक्सवर केली आहे.

shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Sharad Pawar News
Uday Samant : “शरद पवारांचं इंडिया आघाडीबाबतचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे काँग्रेसचा अपमान, राहुल गांधीचं नेतृत्व..” उदय सामंत काय म्हणाले?
allahabad highcourt
“हे हिंदुस्थान आहे, बहुसंख्याकांच्या इच्छेनुसारच देश चालणार”, न्यायाधीशांच्या वक्तव्याची चर्चा!
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Sanjay Raut
“…तर मोदींनी बांगलादेशमधील हिंदूंसाठी काहीतरी केलं असतं”, ठाकरेंच्या शिवसेनेची टीका
mahavikas aghadi mla
अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!
Uday Samant On Jayant Patil
Uday Samant : “जयंत पाटील महायुतीत येणार असतील तर…”, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान

नेमकं काय म्हणाले टी. राजा भिवंडीत?

टी. राजा सिंह यांनी या धर्मसभेत भाषण करताना हिंदूंनी महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंचे हात बळकट करायला हवेत, असं विधान केलं आहे. “आपल्याला सरकारचे हात मजबूत करायला हवेत. एकनाथ शिंदे हिंदू राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांना या माध्यमातून सांगू इच्छितो की महाराष्ट्रच नाही तर पूर्ण देशाचा हिंदू तुमच्यासोबत आहे. मलंगगडाला मुक्त करा. शिंदेजी, तुम्हाला कुणाचं भय आहे? आमच्या सभांना आडकाठी आणली जातेय, महाराष्ट्रात येण्यापासून अडवलं जातंय, आमच्यावर एफआयआर टाकल्या जात आहेत. कुणाचं भय आहे? शिंदेजी घाबरू नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत”, असं टी. राजा म्हणाले.

“तुमच्या आजूबाजूला काही सेक्युलर किडे बसले आहेत. पण त्यांच्याबाबतीत तुम्ही विचार करू नका. जो हिंदूंच्या हितावर बोलेल, तो महाराष्ट्रावर राज्य करेल”, असं सूचक विधानही टी. राजा यांनी केलं. त्यामुळे त्यांचा रोख नेमका कुणाकडे होता? अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

“४०० पारच्या घोषणेमुळे गडबड झाली”; एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यानंतर जदयू नेते म्हणाले, “निवडणुकीत…”

“शिवाजी महाराजांनी हिंदूंच्या रक्षणासाठी प्राण दिले”

“माझ्या शिवाजी महाराजांनी, माझ्या संभाजीने महाराष्ट्रातल्या हिंदूंचं संरक्षण करण्यासाठी आपले प्राण दिले आहेत. आपण महाराष्ट्रात धर्मनिरपेक्षता वाढू देणार आहोत का? नाही. आपल्याला हिंदुत्व हवंय, आपल्याला धर्मनिरपेक्षता नकोय”, असं विधानही टी. राजा यांनी केलं आहे.

“आता हिंदू राष्ट्र होईल असं वाटत नाही”

“हिंदू एकत्र आले तर हिंदू राष्ट्र बनेल हे आम्ही सांगतोय. पण आता असं वाटत नाही की आपण आपल्या भारताला हिंदू राष्ट्र घोषित करू शकू. ही धर्मसभा असली, तरी निवडणुकीच्या दृष्टीनेही आपण याकडे पाहायला हवं. आपले हिंदू कशाप्रकारे विभागले गेले आणि लव जिहादी कसे एकत्र आले. राजकारणावर मला बोलायचं नाहीये. पण राजकारणी नेत्यांशिवाय हिंदू राष्ट्र घोषित होऊ शकत नाही. यावेळी निवडणुकीत जर आपण ४०० पेक्षा जास्त जागा जिंकल्या असत्या, तर हिंदू राष्ट्र घोषित झालं असतं”, असा दावा त्यांनी केला. तसेच, “मी जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत हिंदू राष्ट्रासाठी प्रयत्न करत राहीन”, अशी शपथही त्यांनी उपस्थितांना दिली.

Story img Loader